Shirdi Saibaba Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Saibaba : साई चरणी ६८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ब्रोच अर्पण

Shirdi News : श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : साई भक्तांकडून साई चरणी मोठ्या प्रमाणात दान करत असतात. यातच कर्नाटक येथील एका महिला भाविकाने साई चरणी साडेपाच लाख रुपये किमतीचा सोन्याचा ब्रोच अर्पण केला आहे. साईबाबा संस्थानकडे हा ब्रोच सुपूर्द करण्यात आला असून संस्थांच्या वतीने भाविकाचा सत्कार करण्यात आला. 

श्री साईबाबांवर (Saibaba) देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. अशाच प्रकारे आज मंगळुर (कर्नाटक) येथील अकिला शेट्टी यांनी जवळपास ६८ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्‍याचा ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला. या ब्रोचची किंमत अंदाजे ५ लाख ५० हजार रुपये असून हा सुंदर नक्षिकाम केलेला ब्रोच साईबाबांच्या चरणी अर्पण केला.  

साडेपाच लाख रुपये किंमत असलेला सोन्याचा ब्रोच साई चरणी अर्पण केल्यानंतर (saibaba Sansthan) श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द केला. यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अकिला शेट्टी यांचा सत्‍कार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: राजापूरमध्ये खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू; एका मुलीला वाचवण्यात यश

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

SCROLL FOR NEXT