Sai Sansthan News Saam tv
महाराष्ट्र

Sai Sansthan News : राष्ट्रपतींना आवडले साई प्रसादालयातील जेवण; दोन आचाऱ्यांना थेट राष्ट्रपती भवनातून बोलावणं

Shirdi News राष्ट्रपतींना आवडले साई प्रसादालयातील जेवण; दोन आचाऱ्यांना थेट राष्ट्रपती भवनातून बोलावणं

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : काही दिवसांपूर्वी शिर्डीत साईदर्शनासाठी आलेल्या राष्ट्रपतींसाठी मराठमोळं (Shirdi) जेवण बनवणाऱ्या साई प्रसादालयातील दोन आचाऱ्यांना थेट राष्ट्रपती भवनातून (Rashtrapati Bhavan) बोलावणं आलं आहे. हे दोन आचारी काही दिवस राष्ट्रपतींसाठी जेवण बनवणार आहेत. (Maharashtra News)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  ७ जुलैला साई दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासाठी साई संस्थानच्या प्रसादालयात खास मराठमोळं जेवण बनवण्यात आलं होतं. मटकी, मेथीची भाजी, आलूजीरा, बटाटा वडा, साधं वरण भात अशा प्रकारचं मराठमोळं जेवण बनवण्यात आलं होतं. अतीशय आवडीने राष्ट्रपतींनी जेवणाचा आस्वाद घेतला होता.

दोन आचारी जाणार 

साई संस्थानच्या प्रसादलयात बनवलेले हे मराठमोळं जेवण त्यांना इतकं आवडलं की त्यांनी हे जेवण बनवणाऱ्या राहुल वाहडणे आणि गोरक्षनाथ कर्डिले या दोन आचाऱ्यांना थेट राष्ट्रपती भवनात येण्याचं निमंत्रण पाठवलं आहे. शनिवारी (२९ जुलै) दोघेजण दिल्लीला रवाना होणार असून ते पुन्हा राष्ट्रपतींसाठी जेवण बनवणार आहेत. राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचा सत्कारही केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT