Shirdi News
Shirdi News Saam tv
महाराष्ट्र

Shirdi News: नियुक्‍तीपत्र घेवून गेले विमानतळावर तर समोर आला धक्‍कादायक प्रकार; ११ जणांची फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

शिर्डी : शिर्डी आंतराष्ट्रीय विमानतळावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ११ तरुणांची तब्बल ५५ लाख रुपयांची (Fraud) फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपींनी बनावट नियुक्ती पत्र तयार करून तरूणांना लाखो रुपायांचा गंडा घातला आहे. (Letest Marathi News)

बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिर्डी आंतराष्ट्रीय विमानतळावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ११ तरुणांची तब्बल ५५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. डिसेंबर २०२१ ते मे २०२२ दरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे.

प्रत्‍येकी घेतले ५ लाख

सहा महिन्यांच्या काळात आरोपींनी ११ तरुणांकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांप्रमाणे ५५ लाख रुपये घेऊन चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी आरोपींनी तरुणांना शिर्डी विमानतळाच्या नावाचे बनावट नियुक्तीपत्र देखील दिले. काही दिवसांनी तरुणांनी शिर्डी विमानतळावर जाऊन नोकरीवर हजर होण्यासंदर्भात चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर एका पालकाने शिर्डी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेत तिघाजणांना बेड्या ठोकल्या असून तिघे आरोपी नाशिक जिल्ह्यातील आहेत.

तीन आरोपी ताब्‍यात

या प्रकरणात पोलिसांनी गोकुळ कांदे (वय ३२, निफाड), गोकुळ गोसावी (वय ३१, ता. सिन्नर), रामचंद्र गोसावी (वय ३५, सिन्नर) या तीन आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींना राहाता न्यायालयात हजर करण्यात आले असता तिघांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून शिर्डी पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शासकीय विभागात ज्यावेळी नोकरीच्या जागा निघतात तेंव्हा अधिकृतरित्या जाहीरात दिली जाते. कुणीही पैसे घेऊन नोकरी लावून देण्याचे सांगत असेल तर फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका; असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलंय.

- गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक, शिर्डी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना

Health Tips: नखांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके का येतात?

Health Tips: जेवल्यानंतर लगेचच आंघोळ का करू नये, कारण वाचा

Pune Car Accident: मुलगा बेदरकार, बाप जबाबदार! वडिलांनीच कार दिल्याची मुलाची कबुली; बापाला अटक, पबलाही टाळं

Mumbai Metro: मालाड स्थानकाचं नाव बदललं, आता 'मोतीलाल ओसवाल मालाड'च्या नावाने ओळखले जाणार हे मेट्रो स्थानक

SCROLL FOR NEXT