Shirdi Police Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Police : शिर्डीत भिक्षा मागणाऱ्या १२ मुलांची सुटका; पालकांवर गुन्हा दाखल

Shirdi News : ज्या वयात पाठीवर दप्तर आणि हातात पुस्तकं असायला हवीत, त्या कोवळ्या वयात खांद्यावर हार-फुलांची टोपली आणि भिक्षेसाठी पुढे पसरलेले हात, हे चित्र शिर्डीच्या रस्त्यांवर दिसायला लागलंय..

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : लहान मुलांना भिक्षा मागायला लावाल तर आता जेलची हवा खावी लागणार आहे. यातच शिर्डी पोलिसांनी भिक्षा मागणाऱ्या १२ लहान मुलांची सुटका केली असून त्यांच्या पालकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईने धार्मिक स्थळी भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांना मोठा चाप बसणार आहे.

लहान मुलांना रस्त्यावर उभे करून भिक्षा मागायला लावली जात असते. प्रामुख्याने मोठे धार्मिक स्थळ असलेल्या ठिकाणी मंदिरांच्या बाहेर भिक्षा भिक्षा मागणाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात दिसून येत असते. या भिक्षा मागणाऱ्यांमध्ये लहान मुले नजरेस पडत असतात. दरम्यान शिर्डीत भिक्षेकऱ्यांची वाढलेली संख्येचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना आता भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांचा सर्रास वापर होत असल्याचं समोर आलाय. 

पालकांवर गुन्हा दाखल 

साईंच्या दारात दररोज दिसणारे हे वास्तव बदलण्यासाठी आता शिर्डी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. यामध्ये पोलिसांनी भिक्षा मागणाऱ्या १२ मुलांची सुटका केली आहे. इतकेच नाही तर त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिर्डीत आता मुलांकडून भिक्षा मागण्याच्या प्रकाराला चाप बसणार आहे. तर पोलिसांकडून देखील आणखी शोध मोहीम सुरूच आहे. 

मुलांची आधारगृहात रवानगी 

बालकल्याण समितीने पोलिसांनी सुटका केलेल्या या सर्व मुलांची रवानगी संगमनेर आणि श्रीरामपूर येथील आधारगृहांमध्ये केली असून तिथे त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान पोलिसांच्या या कारवाईमुळे बालमजुरी आणि बालभिक्षेकरी प्रवृत्तीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Disease Symptoms: रात्री १ ते ३ दरम्यान जाग येतेय? असू शकतो लिव्हरचा धोका, वेळीच वाचा लक्षणं

रात्री ICUमधून विषारी धूर येऊ लागला; रूग्णांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला, ८ जणांचा मृत्यू कसा झाला? प्रत्यक्षदर्शीनं दिली माहिती

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची जोरदार तयारी; पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण | VIDEO

Airtel Recharge Offer: एअरटेलचा वार्षिक रिचार्ज प्लॅन; कॉलिंग, डेटासह मिळवा अनेक फायदे, किंमत किती?

Aetashaa Sansgiri : लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारा नवरा कोण?

SCROLL FOR NEXT