शिर्डी नगरपालिकेत भाजप-महायुतीच्या जयश्री थोरात यांचा विजय.
लोकक्रांती सेनेच्या कल्याणी आरणे यांचा पराभव.
विजयाच्या जल्लोषात सुजय विखे पाटील यांची वाघासह दिमाखदार एन्ट्री
सुजय विखे पाटलांची ही दमदार एन्ट्री पाहा. शिर्डी नगरपालिकेत भाजपच्या जयश्री थोरात यांचा विजय झाला आणि विखेंनी प्रतिकात्मक वाघाला घेऊन दिमाखदार एन्ट्री केलीय. यावेळी कार्यकर्त्यांकडूनही 'टायगर अभी जिंदा है' च्या घोषणाबाजी करण्यात आली. शिर्डी नगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटलांची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागली होती. त्यामुळे जयश्री थोरातांसाठी विखे पाटलानी शिर्डी नगरपालिकेत चांगलाच जोर लावला.
अखेर नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत भाजप-महायुतीच्या उमेदवार जयश्री थोरात यांनी लोकक्रांती सेनेच्या कल्याणी आरणे यांचा पराभव करून विजयाचा गुलाल उधळलाय.त्यात राहाता आणि शिर्डी नगरपालिकेतील भाजपच्या विजयानंतर विखे पिता पुत्रांनी चांगलाच जल्लोष साजरा केलाय.
खरतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील अहिल्यानगर दक्षिणमधील पराभवानंतर, सुजय विखे यांनी शिर्डी नगरपालिकेवर आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली होती. त्यात अहिल्यानगरच्या राजकारणात बाळासाहेब थोरात आणि निलेश लंकेंना रोखण्याचं मोठं आव्हानं विखेंपुढे होतं. अशातच शिर्डी नगरपालिकेत मविआला रोखून विखेंनी जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा जोरदार कमबॅक केलयं हे नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.