SHINDE SENA LEADERS FEAR ALLIES? MAHAYUTI INTERNAL RIFT EXPOSED saam tv
महाराष्ट्र

मी नाही भोळा पण मित्रपक्षामुळे पोटात गोळा? भोळ्या शिवसैनिकांना मित्रपक्षाची धास्ती?

Gulabrao Patil Statement On Being Politically Naive: राजकारणात भोळेपणाची किंमत मोजावी लागते, याचे अनेक प्रत्यय समोर आलेत. आता याच भोळेपणावरून महायुतीत शिंदेसेनेच्या नेत्यांना भीतीही वाटू लागलीये. शिंदेसेनेतील नेमक्या कुठल्या नेत्यांना मित्रपक्षाची भीती वाटतेय? पाहूयात यावरचा एक रिपोर्ट...

Rohit Kadam

महायुतीमध्ये सोबत असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना सध्या विरोधकांपेक्षा स्वकीय मित्रपक्षांचीच जास्त धास्ती वाटतेय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महायुतीचं भक्कम आणि बहुमताचं सरकार आहे, यात शंका नाही. पण या महायुतीमध्ये जो भोळा राहील, त्याला हेच मित्रपक्ष संपवून टाकतील, अशी भीती आता शिंदेसेनेच्या रांगड्या शिवसैनिकांना वाटू लागलीय. अखेर शिवसेनेच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी स्वतःच्या मनातली ही खदखद उघडपणे बोलून दाखवत इतर शिवसैनिकांनाही सावध राहण्याविषयी अलर्ट केलय..

जळगाव जिल्हा दूध संघात दिवंगत नेते जे. टी. महाजन यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी बोलताना मंत्री गुलाबराव पाटलांनी थेट बॉम्ब फोडत मी काय भोळा नाही, भोळा असतो तर मला यांनी कधीच खाऊन टाकलं असतं, असा मिश्किल पण थेट निशाणा साधणारा टोला हाणला. तर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनीही याच विधानाला दुजोरा देत मित्रपक्ष भोळ्यांनाच गडप करतात असं म्हटलं. या विधानाचा रोख अप्रत्यक्षपणे भाजपच्याच दिशेने असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात उधाण आलंय. यावरून आता भाजपप्रवक्ते नवनाथ बन यांनी मात्र शिंदेसेनेला सबुरीचा सल्ला दिलाय.

भाजपनं कितीही एकीची एकतेची भावना असल्याचं म्हटलं तरी या तीनही मित्रांमध्ये अंतर्गत कुरबुरी आणि वाद कायम चव्हाट्यावर आलेत. पाहा, आतापर्यंत गाजलेल्या अंतर्गत वाद..

विधान परिषदेच्या निवडणूकीत शिवसेना संपवत, मुंडके उडवण्याचा प्रयत्न झाल्याचा अब्दुल सत्तारांचा आरोप

पालिका निवडणूकीत अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे जास्त नगरसेवक येऊनही काँग्रेससोबत जाऊन भाजपचा शिंदेसेनेला धोबीपछाड

डोंबिवलीत पालिका निवडणूकीत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश दिल्यानंतर शिंदे नाराज झाल्यानं कॅबिनेटला गैरहजर

विधानसभा निवडणूकीत भाजपने आपलं कंबरडं मोडलं म्हणत शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचा भाजपनं शेकापला मदत केल्याचा आरोप

सत्ता येऊन 2 वर्ष झाली तरी रायगड पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद

अजित पवार निधी देत नाहीत असा आरोप करत आमदारांनी बंड पुकारलं आणि आपल्याच पक्षप्रमुख असणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं. पण अवघ्या काही दिवसांत तेच अजित पवार महायुतीत दाखल झाले आणि शिवसेनेची पुन्हा गोची झाली.. सत्तेच्या वाटणीपासून ते तिकीटवाटपापर्यंत, वरवर गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या महायुतीत जेव्हा जेव्हा स्वतःच्या वाट्याचा हिस्सा मित्राला देण्याची वेळ येते, तेव्हा तेव्हा या मित्रांनी एकमेकांचे वस्त्रहरण केल्याचं महाराष्ट्रानं पाहिलंय. आता शिवसेनेच्या पोटातली ही खदखद बाहेर आल्याने, वरवर भक्कम दिसणाऱ्या महायुतीचा पायाच पोकळ होतोय की काय? असा सवाल निर्माण झालाय!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Director Hospitalized: प्रसिद्ध दिग्दर्शकाची प्रकृती गंभीर; रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार

स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी भीषण अपघात; अनियंत्रित ट्रकची टेम्पो आणि दुचाकीला जोरदार धडक, ७ जण ठार

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत तिरंगा बाईक रॅली; सहपालकमंत्री आशिष जयस्वाल मोटरसायकलवर स्वार

मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला; भाजप नेत्याचं मिश्किल वक्तव्य

Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होणार; १, ०१,००० रुपयांपर्यंत मिळणार लाभ, काय कराव लागेल

SCROLL FOR NEXT