Jalgaon Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime: पोलिस अधिकाऱ्याची महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी, शिवीगाळ केल्याने शिंदेसेनेच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा

Jalgaon Crime: जळगावमध्ये शिवसेना शिंदेगटाचे बड्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेत्याने पोलिस अधिकाऱ्यावर भरसभेत गंभीर आरोप करत शिवीगाळ केली होती.

Priya More
  • जळगावमध्ये माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

  • आंदोलनातील भाषणात पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती

  • BNS कलम 352 आणि 356(3) अंतर्गत गुन्हा दाखल

  • प्रकरणामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ.

संजय महाजन, जळगाव

जळगावच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिंदेसेनेच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणे आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध पोलिस अधिकाऱ्यास शिवीगाळ केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणे आंदोलनातील भाषणादरम्यान पीएसआय संदीप घुले यांना शिवीगाळ आणि बदनामीकारक अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक घुले हे तरुणांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देत आहेत. तसेच एका पोलिस कर्मचारी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत असल्याचा आरोप करत उन्मेश पाटलांकडून पोलिस अधिकाऱ्यास शिवीगाळ करण्यात आली होती. गोपनीय शाखेतील पोलिसाच्या तक्रारीवरून BNS कलम 352, 356 (3) अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.जळगावमध्ये माजी खासदार Unmesh Patil यांच्याविरोधात गुन्हा दाखल.

  1. आंदोलनातील भाषणात पीएसआय Sandeep Ghule यांच्यावर शिवीगाळ व आरोप.

  2. BNS कलम 352 आणि 356(3) अंतर्गत NC नोंद.

  3. प्रकरणामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनादरम्यान पोलिस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्याविरोधात शिवीगाळ आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी आंदोलनादरम्यान केलेल्या भाषणात उन्मेष पाटील यांनी पीएसआय संदीप घुले यांना शिवीगाळ आणि बदनामीकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याच्या गोपनीय शाखेतील कर्मचाऱ्याने याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात NC क्रमांक 613/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 352 व 356(3) अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक घुले हे तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवत आहेत. त्याच बरोबर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करत असल्याचा आरोप माजी खासदार उन्मेश पाटील यांनी जाहीर भाषणात केला होता. यावेळी त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diamond Mangalsutra Designs: नववधूसाठी खास डायमंड मंगळसूत्र; लेटेस्ट 5 डिझाईन्स ट्रेंडिंगमध्ये

Maharashtra News Live Update: श्रावणातील तिसऱ्या सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

8th Pay Commission : 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद होणार? NC-JCM ने सांगितलं सत्य

Manoj Jarange: मराठ्यांनो मुंबईकडे निघा, पाहुण्यांकडे राहा; मनोज जरांगेंनी सांगितला आंदोलनाचा संपूर्ण प्लान

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

SCROLL FOR NEXT