कणकवलीत होणाऱ्या कुस्तीत ठाकरे आणि शिंदेसेनेत दोस्ती होणार आहेत... होय तुम्ही ऐकताय.. ते अगदी खरयं... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकणात एक नवीन आघाडी पाहायला मिळणार... कोकणातील ही आघाडी नेमकी कोणाची आहे? ही आघाडी कोणाला घेरणार?
निवडणुकीनंतर शिंदेसेनेसोबत युती नको,या उद्धव ठाकरेंच्या आदेशाला कणकवलीत बगल देण्यात आलीय...एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असतानाच कणकवली नगरपंचायतीत मात्र आजचे वैरी मित्र बनण्याच्या मार्गावर आहेत.
शिंदे- ठाकरेसेना एकत्र येणार?
कणकवली शहरात शिंदेसेना आणि ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गुप्त बैठक
बैठकीत नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत चर्चा
दोन्ही गट 'शहर विकास आघाडी' या नावानं निवडणुकीला सामोरे जाणार
कणकवली शहराच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचं आणि राजकीय पक्षांसोबत समाजसेवी संस्थाचांही य़ात समावेश असल्याची माहिती राजन तेलींनी दिलीय...
दरम्यान कणकवलीतलं राजकारण नेहमीच नितेश राणे विरुद्ध इतर सर्व पक्ष असं राहिलं आहे....त्यामुळे य़ा आघाडीला आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ असा टोला भाजपनं लगावलाय...दरम्यान कणकवली नगरपंचायत ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते तिथलं राजकीय बलाबल नेमकं कसं आहे?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि ठाकरेसेनेत काटे की टक्कर होतं असते...सावंतवाडी, वेंगुर्ला या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत भाजपच्या तर मालवण नगरपरिषद ठाकरेसेनेच्या ताब्यात आहे.. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे पिता-पुत्रांचं नेहमीचं वर्चस्व राहिलं आहे... नितेश राणेंनी याआधी जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिला होता... अशातच नगरपंचायतीसाठी झालेल्या गुप्त बैठकांमुळे जिल्ह्यात भाजप विरुद्ध इतर पक्ष असाच सामना रंगणार आहे... त्यामुळे ठाकरेसेना आणि शिंदेसेनेची आघाडी झाल्यास महायुतीत नव्या वादाला तोंड फुटेल....मात्र राणेंना शह देण्यासाठी विरोधक खरचं आघाडीचा पर्याय निवडतात का? विचारधारेला आणि राज्यातील वादाला तिलांजली देऊन स्थानिक निवडणुकीसाठी ठाकरेसेना आणि शिंदेसेना एकत्र येणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.