Sambhajinagar News: संभाजीनगर लोकसभेची जागा शिंदे गटाच लढणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे यांनी केले आहे. 'लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची जागा आजपर्यंत शिवसेना लढवत आली आहे. त्यामुळे शिंदे गटच ही जागा लढणार आहे' असे संदिपान भुमरे म्हणाले.
तसेच पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढणार असेही यावेळी भूमरे यांनी स्पष्ट केले. रोहयो मंत्री संदीपान भुमरे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
भुमरे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटात मतभेद होण्याची शक्यता आहे. कारण भाजपकडून देखील संभाजीनगर लोकसभेसाठी तयारी केली जात असल्याची चर्चा आहे.
अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार - भुमरे
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणे गरजेचे असून अधिवेशनापूर्वी तो होईल असा आशावाद रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे. भुमरे यांनी पंढरपूर येथे बोलताना हा आशावाद व्यक्त केल्याने इच्छुक आमदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
शिंदे गटाचे आमदार नाराज
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीनंतर सत्ताधारी आमदारांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. कारण शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपने आपल्याला विश्वासात न घेतल्याचा दावा करत नाराजी व्यक्त केली आहे.
याआधी व्यक्त केलीये नाराजी
शिंदे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही यावरुन जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. बच्चू कडू यांनी देखील मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन नाराजी व्यक्त केलीय. आता संजय गायकवाड यांनी देखील जाहीरपणे नाराजी बोलवून दाखवली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.