Shahaji Bapu Patil on Ajit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Shahaji Bapu Patil on Ajit Pawar: अजित पवार गुडघ्याला बाशिंग बांधून, पण नवरी काय मिळेना; शहाजी बापू पाटील असे का म्हणाले?

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सूरज सावंत

Shahaji Bapu Patil News: शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'अजित पवार मुख्यमंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग घेऊन फिरत आहेत. मात्र, नवरी काय मिळत नाही, अशा शब्दात शहाजी बापू पाटील यांनी टीका केली आहे. (Latest Marathi News)

आमदार शहाजी बापू पाटील यांनी 'शासन आपल्यादारी' या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, अनिल बाबर, महेश शिंदे उपस्थित होते.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शहाजी बापू पाटील म्हणाले, 'राजकारण खालच्या थराला गेलं आहे. रोज उठून काहींना काही आरोप ते मातोश्रीतील आणि ३-४ टाळकी करत असतात. एरवी कधीही न घराबाहेर पडलेले उद्धव ठाकरे, आम्ही गुवाहाटीला गेलो की आता तरणेताट झाले. आता सर्व मणके व्यवस्थित झाले'.

'दररोज उठून आठ महिने आमच्यावर भूंकत आहे. शिंदेंची नियत साफ आहे. आज कर्नाटकचा निकाल लागला. मात्र आनंद मातोश्रीला जास्त झाला. आम्हाला शिव्या देताय. आम्ही तडफदार आहोत. आम्ही दबंग आणि बाजीगर आहोत. आम्हाला आमदारकीच्या काय भीती का घालता? आम्ही पहिल्या रांगेतले आहोत. आम्ही कुणाला घाबरत नाही, असा इशारा शहाजी बापू पाटील यांनी दिला.

'उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अडीच वर्षात फक्त २ कोटी खर्च केले.मात्र शिंदेंच्या कार्यकाळात कोट्यावधी रुपये खर्च करून अनेकांचे जीवन वाचवले. शिवसेनेचा भगवा हा पताका खांद्यावर घ्या आणि आठवण ठेवा, आपल्या शंभूराजेंना निवडून द्या. आपल्या झाडीवर सध्या संजय राऊत पडलेय,म्हणून आपला डॉयलॉग परत घेतो, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वसईत हिंतेद्र ठाकूर आघाडीवर

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT