Sanjay Shirsat News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यासहित संजय शिरसाट यांच्याकडून ठाकरे गटावर जोरदार टीका करण्यात येत आहे. याचदरम्यान, 'शिवसेनाप्रमुख अहंकारी नव्हते, पण आदित्य-उद्धव ठाकरे यांच्यात अहंकार भरलाय, अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. (Latest Marathi News)
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे पिता-पुत्रावर जोरदार टीका केली आहे. 'आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदारांनी पळून जाऊ नये म्हणून त्यांनी दरवाजे लावून घेतले आहेत. त्यांनी स्वत:सह कोंडून घेतले आहे. शिवसेना ज्येष्ठ नेते आदित्य ठाकरे हे आता भाकीत व्यक्त करत आहेत. शिवसेनाप्रमुख अहंकारी नव्हते, आदित्य-उद्धव ठाकरे यांच्यात अहंकार भरलेला आहे'.
संजय राऊत यांच्या आरोपावर भाष्य करताना संजय शिरसाट म्हणाले, 'संजय राऊत यांनी खोटे बोलण्याची परंपरा आजही कायम ठेवली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असणार असे अनेकदा बोलले होते. सत्तेचं वाटप 50-50 प्रमाणे वाटप झाले पाहिजे होते,यासाठी सगळे तयार होते'.
'एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर संघटना हातात घेतील असे आमच्यातले काही जणांनी त्यांना सांगितले. या सर्व घटनेला आम्ही साक्षीदार होतो, एकनाथ शिंदे यांच्या नावाला कोणाचाही विरोध नव्हता. त्यावेळी त्यांचा (उद्धव ठाकरे) आग्रह युती तोडण्याकडे होता. विशेष म्हणजे शिवसेना नेतृत्वाला धक्का बसला असता अशी चुकीचा समज ठाकरे गटाच्या काहींनी मेसेज दिला, असे ते म्हणाले.
'संजय राऊत हे शरद पवार यांचा दूत म्हणून काम करीत होते. सत्ता आता ५ वर्ष मिळणार आहे, या आशेपोटी केले गेले, असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना शिरसाट म्हणाले, 'मीही अनेक वेळा सांगतो, आम्हाला सुद्धा संजय राऊत यांचं नाव तोंडावर घेणं आवडत नाही, परंतु त्यांनी काय बंगाली जादू केली माहिती नाही, खरंतर त्यांना मानसोपचाराची गरज आहे'.
'संजय राऊत हे प्रकरणं हे महाराष्ट्राला कंटाळा आला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी शिकमोर्तब केला आहे की संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर शिरसाट म्हणाले, 'काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या भेटीमुळे सर्व चर्चांना उधाण आले आहे. ही राजकीय भेट असावी असा माझा अंदाज आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.