Sanjay Shirsat  Saam Tv
महाराष्ट्र

Shinde Vs Thackeray : वर्षा बंगला, सुपारीचा खेळ अन् बंगालचे जादूगार; शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचा नेमका कुणावर निशाणा?

Sanjay Shirsat On Sanjay raut allegation about Supari Varsha Bungalow : शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. वर्षा बंगल्यावर सुपारीचे खेळ चालतात, या वक्तव्यावरून त्यांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय.

Rohini Gudaghe

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज आरोप केलाय की, वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) सुपारीचा खेळ चालतो. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. वर्षा बंगल्यावर सुपारीचा खेळ करण्याचा आमचा कोणता उद्देश नसतो, आम्ही ते करतही नाही. बंगालचे जादूगार जसे तुमच्या बंगल्यावर बसलेले आहेत, तसे आमच्या बंगल्यावर कोणतेही जादूगार नाहीत, असा टोला देखील त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट सामटीव्हीसोबत संवाद साधत होते.

संजय शिरसाट यांचा कुणावर निशाणा?

आमची जादू सर्वसामान्यांच्या जीवावर चालते. सर्वसामान्य माणूस आमच्यासोबत आहे. यामुळे त्यांना भीती, न्यूनगंड वाटत आहे. त्यामुळे ते कितीही काहीही बोलले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्य वक्तव्यावर दिलीय. आम्ही ज्या स्पीडने चाललो आहे, ते त्यांना पाहावत नाही, हे सत्य असल्याचं शिरसाट (Shinde Group Leader Sanjay Shirsat) म्हणाले आहेत.

वर्षा बंगल्यावर सुपारीचा खेळ

आम्ही मातोश्रीवर आंदोलक कसे पाठवणार? असा सवाल देखील शिरसाट यांनी विचारला आहे. आंदोलक एका दिवसात तयार होत नाही. तो कोणत्या तरी पक्षाशी संबंधित असतो, त्याची चौकशी करा. तुम्हाला लोकसभेत मतं घेताना लाज वाटली नाही का? मग त्यांच्या मागण्याना समोर जा, अशी परखड टीका शिरसाट यांनी ठाकरे गटावर (Maharashtra Politics) केलीय. पहिलं जसं तुम्ही त्यांची बिर्याणी खाल्ली, आता तुम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घातली पाहिजे. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार तुम्ही केला पाहिजे, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

लोकसभेत पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणूक काढत होता. ज्या लाचारीने तुम्ही मतं मागितले, त्यामुळे आता मुस्लिम आणि दलित समाज तुमच्यासोबत नाही. दरम्यान संजय राऊत यांनी पुराव्यांबद्दल वक्तव्य केलं (Shinde Vs Thackeray) होतं. यावर तुमच्याकडे असलेले पुरावे घेऊन पोलीस आयुक्त यांच्याकडे जा आणि दाखवा, गुन्हे दाखल करा असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी राऊतांना दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT