Political News  Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Shirsat: 'अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा फार्म्युला ठरला होता, पण...'; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा

Sanjay Shirsat on BJP and Shivsena CM Formula : आधी भाजप अडीच आणि नंतर शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद घेणार होतं. मात्र त्यांना (उद्धव ठाकरे) युती करायचीच नव्हती.

सूरज सावंत

Political News :

शिवसेना आणि  भाजपमध्ये २०१९च्या निवडणुकीआधी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला होता का? याबाबत ठोस कुणीही सांगू शकणार नाही. दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे आजही केले जात आहेत.

उद्धव ठाकरेआणि त्यांचे नेते वारंवार अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याचं बोलत आहेत. मात्र असं काही ठरलंच नसल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र यादरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे.

संजय शिरसाट यांनी म्हटलं की, अडीच-अडीच वर्षांचा फार्म्युला ठरला होता, तर नक्कीच ठरला होता. मात्र ज्यांच्याकडे १०५ आमदार होते, त्यांचा तो सन्मान होता. त्यामुळे आधी भाजप अडीच आणि नंतर शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद घेणार होतं. मात्र त्यांना (उद्धव ठाकरे) युती करायचीच नव्हती.  (Latest Marathi News)

भाजपसोबत त्यांना जायचंच नव्हता. त्यामुळे त्यांनी पहिले आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद द्या असा हट्ट धरला. त्यानंतर भाजपने अडीच वर्षांची ऑफर मान्यही केली. मात्र शरद पवारांनी ५ वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याने निती फिरली, असा खुलासा संजय शिरसाट यांनी केला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाविकास आघाडीत ताळमेळ आहे का?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. युती होणार, नाही होणार? किती जागा मिळणार? भाजप घटक पक्षांना बुडवणार, अशा वल्गना केल्या जात आहेत. काही जण दिलेल्या शब्दांची वारंवार गोष्टी करत आहेत. मात्र माध्यमातून येणारी माहिती चुकीचे आहे. योग्य तो सन्मान आमचा ठेवला जाणार हे ठरलेलं आहे. मात्र महाविकास आघाडीत ताळमेळ आहे का? वंचित कुठे काँग्रेस कुठे?, असा सवाल संजय शिरसाट यांनी केला.

सोमवारपर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल

महाराष्ट्राच्या युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्ली जातील, अशी माहिती मिळत आहे. जागावाटपाचा आकडा ठरलेला नाही. भाजप जास्त जागा मागत आहे. आमचे १३ खासदार आहेत, मात्र आम्ही १८ जागा मागत आहोत. कोणत्या जागा सोडायच्या हे तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील. प्रत्येक मतदार संघाच सर्व्हे केलेला आहे. सोमवारपर्यंत सगळा संभ्रम दूर होईल, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT