CM Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदे गटाचा 120 जागांवर दावा, अजित पवार गटाने केली इतक्या जागांची मागणी; भाजपची भूमिका काय?

Mayawati News: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाने थेट 120 जागांवर दावा ठोकला आहे. यातच जागावाटपावरुन महायुतीत धुसफुस सुरू झाली आहे.

Tanmay Tillu

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आलाय. महायुतीतल्या सर्व पक्षांच्या नेतृत्वाच्या जागावाटपावर बैठकाही सुरू झाल्याचं कळतंय. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यताय. शिवसेना राज्यात 120 जागा लढवेल, असा दावा संजय गायकवाडांनी केलाय.

एवढंच नव्हे तर १०० जागा जिंकण्याचा विश्वासही गायकवाडांनी व्यक्त केलाय. तर दिल्लीतले नेते महायुतीतल्या सर्व पक्षांना न्याय देतील, अशी आशा भुजबळांनी व्यक्त करत गायकवाडांना टोला लगावलाय.

शिंदेंच्या शिवसेनेचा तब्बल १२० जागांचा दावा भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कदापी मान्य होणार नाही. कारण महायुतीतले मोठे तीन पक्ष आणि छोट्या पक्षांचा विचार करूनच अजित पवारांनी केवळ ६० जागांचा आग्रह धरलाय. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि त्यांना समर्थन करणाऱ्या अपक्ष आमदारांनी जिंकलेल्या जागांवर अजित पवारांनी दावा सांगितलाय. मात्र त्यांच्या दुप्पट जागा शिंदे गटाला हव्या आहेत. शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढण्याला कारणंही तशीच आहेत.

शिवसेनेला हव्या 120 जागा

लोकसभेला शिंदे गटाचा स्ट्राईकरेट भाजप आणि राष्ट्रवादीपेक्षा चांगला राहिला आहे. लोकसभेत भाजप आणि राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा फारच कमी जागा जिंकता आल्या. लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांचीच असल्याचं बिंबवण्यात यश शिंदे गटाला यश येताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी मीच महायुतीचा कॅप्टन असल्याचं जाहीर विधान केलं होतं. त्यामुळे शिंदे गटानं जागावाटपाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय. तर ठाकरे गटानं १२० जागांच्या दाव्याची खिल्ली उडवलीय.

दरम्यान, गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये शंभरीपार गेलेला भाजपची यावेळी दोन पक्षांसोबत महायुती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर आहे. कारण शिंदे गटाला लोकसभेत मिळालेलं यश आणि दिल्लीश्वर त्यांची राखत असलेली मर्जी पाहता शिंदे गटही जास्तीत जास्त जागांवर दावा करतोय. जास्त जागा लढवल्या तरच जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे. महायुतीतलं मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच राहावं यादृष्टीनं शिंदे गट रणनीती आखत असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT