'ती' ऑडिओ क्लिप महागात पडली, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हाकालपट्टी
Kundlik Khande News Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO : 'ती' ऑडिओ क्लिप महागात पडली, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हाकालपट्टी

विनोद जिरे

शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी तसं पत्र देखील काढलं आहे. शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, कुंडलिक खांडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप चार दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. यामध्ये आपण पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केलं असून बजरंग बाप्पांना मदत केली, असं बोलताना यात ऐकू येत आहे.

यासोबतच राज्याचे कृमांत्री धनंजय मुंडेंवर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबतचे वक्तव्य केल्याचंही यात ऐकू येत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर परळी आणि बीड पोलिसात गुन्हे देखील दाखल झाले होते.

कुंडलिक खांडे यांना अटक

दरम्यान, कुंडलिक खांडे याना आज पोलिसांनी अटक केली आहे. शिंदे गटाचे उपाध्यक्ष माऊली खांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अहमदनगर महामार्गावरील जामखेड येथून त्यांना अटक केली आहे. काही महिन्यापूर्वी बीड ग्रामीण पोलिसात 307 चा गुन्हा दाखल झाला होता. आता याच गुन्ह्यात खांडे यांना अटक झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raosaheb Danve आणि Raju Shinde यांच्यामध्ये चर्चा, राजू शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न

Anant Ambani Sangeet: अंबानींच्या संगीत सोहळ्याला सेलिब्रेटींची मांदियाळी, PHOTO एकदा पाहाच

Shocking VIDEO : धावत्या दुचाकीवर सेल्फी काढायला गेला अन् धाडकन पडला; तरुणाच्या मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

Kalyan Politics : कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या 'लाडक्या भावांना' आवरा; 'लाडकी बहीण योजने'वरून काँग्रेस नेते आक्रमक

VIDEO: Manoj Jarange Patil यांची जनजागृती शांतता रॅली, स्वागताला भला मोठा हार आणि क्रेन सज्ज

SCROLL FOR NEXT