Maratha Aarakshan Andolan:  Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Andolan: शिंदे सरकारच्या शिष्टमंडळाचा मनोज जरांगे भेटीचा दौरा रद्द; कारण काय?

Maratha Andolan: मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी जालना दौरा केल्यानंतर शिष्टमंडळानेही त्यांचा दौरा रद्द केल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

Vishal Gangurde

Maratha Andolan News:

जालन्यातील अंतरावाली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ भेटीसाठी जाणार होतं. मात्र, मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी जालना दौरा केल्यानंतर शिष्टमंडळानेही त्यांचा दौरा रद्द केल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे गेल्या दोन आठवड्यापासून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली जात आहे. सरकारच्या विनंतीनंतर जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी येऊन माझं उपोषण सोडवावं अशी अट ठेवली होती.

जरांगे यांच्या अटीनंतरही आज सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला जाणार होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दौरा रद्द केल्यानंतर शिष्टमंडळाने दौरा रद्द केल्याची माहिती हाती आली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दौरा रद्द केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे , मंत्री उदय सामंत , आमदार नारायण कुचे, सुरेश नवले यांनी दौरा रद्द केला आहे.

मनोज जरागे यांना एक महिन्याचं आश्वासन कोण देणार म्हणून शिष्टमंडळाने हा दौरा रद्द केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

तत्पूर्वी, जालन्यात अंतरवाली सराटी गावात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याची जोरदार चर्चा होती. यामुळे साऱ्यांच्या नजरा अंतरवाली सराटीकडे लागल्या होत्या. तसेच प्रसार माध्यामांचे कॅमेरेही सज्ज झाले होते. मात्र, याचदरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या शिष्टमंडळाचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

ZP Election: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार थांबवला

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? ₹१५०० रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट

Petrol-Diesel Price: 'तो' एक निर्णय सर्वसामान्यांना 'महागा'त पडणार,पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार

ZP Election: निवडणूक अन् CTET परीक्षा एकाच दिवशी; इलेक्शन ड्युटी करुन परीक्षा कशी द्यायची? शिक्षकांच्या मनात संभ्रम

SCROLL FOR NEXT