vinay kore speech at shetkari sahakari sangh election in kolhapur  saam tv
महाराष्ट्र

Vinay Kore News : ...म्हणून ताे खटाटाेप केला! शेतकरी सहकारी संघ निवडणुकीच्या प्रचारात विनय कोरेंचा गौप्यस्फोट (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

भवानी मंडप येथे असलेल्या शेतकरी संघाच्या इमारतीत आम्हीच आग लावली आणि इमारत पुन्हा मुंबईतील कंपनीच्या ताब्यातून परत मिळवली असा गाैप्यस्फाेट जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे (vinay kore) यांनी काेल्हापूरात केला. दरम्यान शेतकरी संघ वाचविण्यासाठी हा खटाटाेप केल्याचे कोरे यांनी नमूद केले. (Maharashtra News)

कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे (shetkari sahakari sangh election) पडघम वाजू लागलेले आहेत. या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र येऊन राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी (rajashree shahu shetkari vikas aghadi) स्थापन करून ही निवडणूक लढवली जात आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी कोल्हापुरात झाला.

यावेळी विनय कोरे यांनी त्यांच्या भाषणातून शेतकरी संघाच्या इमारतीबद्दल आणि तिथल्या राजकारणाबद्दल अनेक गौप्यस्फाेट केले. त् म्हणाले मधल्या काळात शेतकरी संघ आर्थिक अडचणीत सापडला होता. यावेळी शेतकरी संघानं त्यांच्याकडे असलेल्या अनेक जागांची विक्री केली होती.

आशिया खंडात सर्वात मोठ्या शेतकरी संघाची पहिली इमारत अर्थात मॉल असल्याने या इमारतीचा काही भाग मुंबईतील एका कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. यानंतर या कंपनीने ही जागा रिकामी करून देण्यास विरोध दर्शविला. तसेच कंपनीने कोर्टात धाव घेतली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काेर्टातून इमारत मिळेल अशी शाश्वती नव्हती. यामुळे कंपनीच्या ताब्यातून ही जागा रिकामी करण्यासाठी शेतकरी संघातील नेत्यांनी एक शक्कल लढवली असे काेरेंनी नमूद केले. ते म्हणाले या इमारतीस आग लागली. त्यानतंर सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून इमारत ताब्यात आली. त्यानंतर शेतकरी संघाकडे इमारत ताब्यात आल्याचे काेरेंनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT