shashikant shinde & mahesh shinde saam tv
महाराष्ट्र

Shashikant Shinde Vs Mahesh Shinde : जिहे कटापूरच्या पाण्यावरून राजकारण पेटलं; शशिकांत शिंदेंचा माेर्चाचा इशारा

Morcha in Jihe Katapur: त्यामुळे आज या जिहे कटापुर पाणी योजनेच्या ठिकाणी रामोशीवाडीच्या ग्रामस्थांना घेवून आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रशासनाच्या विरोधात सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

ओंकार कदम

Satara Latest News: साताऱ्यातील जिहे कटापूर योजेनेतील पाण्यावरून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (mla shashikant shinde) आणि शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (mla mahesh shinde) यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. या योजनेच्या वर्धनगड घाटातील बोगद्यालगत असणाऱ्या रामोशी वाडी तलावात पाणी जाणाऱ्या आउटलेट वॉल रात्री पावणेतीन वाजता पोलीस प्रशासन आणि जिहे कटापूर योजनेचे अधिकारी यांनी खाजगी कामगार यांच्या सहकार्याने पोलीस बंदोबस्तामध्ये बंद करण्याचा प्रयत्न केला.

तो गावकऱ्यांनी हाणून पाडला. या रामोशीवाडीतील गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी आमदार महेश शिंदे हा वॉल बंद करण्याचा प्रयत्न करताहेत असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. (Maharashtra News)

त्यामुळे आज या जिहे कटापुर पाणी योजनेच्या ठिकाणी रामोशीवाडीच्या ग्रामस्थांना घेवून आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रशासनाच्या विरोधात सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध आमदार महेश शिंदे असा संघर्ष सातारा जिल्ह्यात उफाळला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार! चेंबूरमध्ये पालिका रुग्णालयाबाहेर ४ फुटांपर्यंत पाणी, रुग्णांना खांद्यावरून नेण्याची वेळ; पाहा VIDEO

Big Boss 19: 'बिग बॉस १९'च्या घरात 'गँग्स ऑफ वासेपूर'च्या अभिनेत्याची एन्ट्री; हे १२ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब

Red Carpet: फक्त सेलिब्रिटी किंवा खास लोकांचे स्वागत करण्यासाठीच रेड कार्पेट का घालतो?

SCROLL FOR NEXT