Sharad Pawar/Devendra Fadanvis Saam TV
महाराष्ट्र

'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्यांना, मी येऊ दिलं नाही; पवारांचा फडणवीसांना टोला

सत्तेसाठी नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही महाविकास आघाडी काम करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उस्मानाबाद :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत यावेळी कार्यक्रमात बोलताना पवारांनी विविध मुद्यावर भाष्य करत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. काहीजण निकालाआधी मी येणार असं सांगत होते, मात्र त्यांना मी येऊ दिल नाही, असा टोला त्यांनी फडणवीसांना (Devendra Fadnavis) लगावला.

पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्र विकास आघाडी यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करत आहे. शिवछत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रीत करून स्वराज्य उभं केलं, देशात अनेक राज्य झाली, कुठे मोगल झाले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरू

Rain Alert: पुढचे १० तास महत्वाचे! वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, ताशी ७० ते ८० वेगाने वारे वाहणार; महाराष्ट्रासह १६ राज्यांना इशारा

आधी ज्योतिष्याला OSDपद, आता चित्रपट निर्मात्याची थेट कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं खळबळ

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते दिल्लीसह 9 मार्गांवर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT