Sharad Pawar wrote letter to CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Drought: दुष्काळाच्या बैठकीला मंत्री गैरहजर, आश्वासक बदल न झाल्यास संघर्ष होईल, दुष्काळासंदर्भात शरद पवारांचं शिंदेंना पत्र

Sharad Pawar News: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्र लिहिलं आहे. तसेच त्यांनी यातून पाणी टंचाई परिस्थिती चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील दुष्काळासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. दुष्काळाच्या बैठकीला मंत्री गैरहजर होते. मंत्र्यांच्या गैरहजेरीची दखल घेतलीच असेल, असं शरद पवारांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. तसेच आश्वासक बदल न झाल्यास संघर्ष होईल, असा इशारा शरद पवार यांनी आपल्या पत्रातून दिला आहे.

शरद पवार यांनी पत्रात काय लिहिलं?

शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे की, ''मी मागील महिन्यात दिनांक २४ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. सदर पत्रकार परिषदेते मी राज्य सरकारशी सहकार्य करण्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची भुमिका घेतली होती.''

यात लिहिलं आहे की, ''आपण देखील आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्‌यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. परंतू या महत्वपुर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधी व मंत्री गैरहजर होते. आपण या बाबीची योग्य ती दखल घेतली असेलच. मात्र राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.''

पत्रात लिहिलं आहे की, ''मागील दहा दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील उजनी जायकवाडी सारखी महत्वाची धरणे आटली आहेत. संपुर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाला देखील बसली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगांव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.''

पवारांनी पत्रात पुढे लिहिलं आहे की, ''शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवाडयासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी ह्या तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT