PM Narendra Modi And NCP Chief Sharad Pawar  saam tv
महाराष्ट्र

PM Modi On Sharad Pawar: शरद पवारांना तेव्हा पंतप्रधान होता आलं असतं, पण... PM मोदी काय म्हणाले, वाचा...

Ruchika Jadhav

Political News: सामान्य जनतेसह राजकीय नेत्यांना सध्या आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांची इंडिया आघाडी जोमाने कामाला लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारसह सत्तेत सहभागी झाल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. अशात आता पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांविषयी एक चकित करणारं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

"अनेक नेत्यांमध्ये क्षमता असताना देखील त्यांना पंतप्रधान होता आलं नाही. शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला देखील डावललं गेलं", असा दावा मोदींनी केला आहे. मोदींनी या आधी राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र आता शरद पवारांविषयी त्यांनी अशी खंत व्यक्त केल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्यात.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील खासदारांची दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे बैठक घेतली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी शरद पवारांविषयी भाष्य केलं आहे. तसेच खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिलेत.

"आपली युती फक्त निवडणुकी पुरती नाही. ही भावनिक युती आहे. आपली युती २५ वर्षांपेक्षा जास्त अभेद्य राहावी, असं मोदींनी यावेळी म्हटलं. तसेच पुढे "आता खासदारांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. सत्तेत सगळ्यांचा समसमान वाटा असेल, असंही मोदींनी यावेळी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

SCROLL FOR NEXT