sharad pawar and devendra fadnavis  Saam tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की लांबणार? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नवा ट्विस्ट, VIDEO

Maharashtra politics : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन आता शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस आमने-सामने आलेत. त्यांचे विलिनीकरणावरुन दावे प्रतिदावे रंगलेत. शरद पवारांनी फडणवीसांना काय उत्तर दिलंय ? राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार

Suprim Maskar

अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन पवार विरुद्ध फडणवीस संघर्ष रंगलाय... कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेत थेट पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं... अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत कुठलीही चर्चा झाल्याचं सांगितलं नाही असा दावा केला. त्या दाव्यावर पवारांनी थेट वक्तव्य केलं..

खरंतर 28 जानेवारीला अजित पवारांचा मृत्यू झाला... 29 जानेवारीला दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आणि 30 जानेवारीला पवारांनी विलिनीकरणावर भाष्य करत विलिनीकरण ही अजित पवारांचीच इच्छा होती... आणि त्याची तारीखही दादांनी ठरवल्याचा दावा केला आणि हेच भाजपला खटकलं....

आता पवारांनी विलिनीकरणावर भाष्य केल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांनीही या वादात उडी घेतली... विलिनीकरणाची चर्चा सुरु असती तर दादांनी आपल्याला माहिती दिली असती...हे सांगत अप्रत्यक्षपणे फडणवीसांनी विलिनीकरणाच्या चर्चेत भाजप मध्यस्थाच्या भूमिकेत येत असल्याचं सुचित केलं...

दुसरीकडे ज्यांचा विलिनीकरणाच्या चर्चेत सहभाग नाही... त्यांना काय माहीत असणार... असं वक्तव्य पवारांनी याआधी अनौपचारिक गप्पांमध्ये केलं होतं....आता पुन्हा एकदा पवारांनी तेच वक्तव्य माध्यमांसमोर करत अप्रत्यक्षपणे भाजपची मध्यस्थी धुडकावून लावल्याचं चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT