Manasvi Choudhary
आजकाल धावपळीच्या जीवनशैलीत आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अपचन, गॅस, बद्धकोष्ठता आणि पोट साफ न होण्याच्या समस्या अनेकांना उद्भवतात.
यासाठी पोटातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आणि पचनक्रिया मजबूत करण्यासाठी शरीराला डिटॉक्स करणे अत्यंत गरजेचे असते.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने पोटाची हलकी स्वच्छता होते. लिंबामध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स चयापचय क्रिया वेगवान करतात आणि पचन सुधारतात.
जिरे आणि ओवा हे दोन्ही मसाले पोटाच्या विकारांवर अचूक औषध मानले जातात. यामुळे गॅस, अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून त्वरित आराम मिळतो.
बडीशेप शरीराला थंड ठेवणारी आणि पचनक्रिया सुरळीत करणारी असते. जेवणानंतर किंवा सकाळी बडीशेपचे पाणी प्यायल्याने पोटातील जळजळ कमी होते आणि आतड्यांना आराम मिळतो.
आल्यामुळे पोटातील पाचक रस सक्रिय होतात, तर पुदिना पोटातली उष्णता कमी करून पचनसंस्थेला शांत करतो. हा चहा आतड्यांमधील घाण बाहेर टाकण्यास मदत करतो.
ताकामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात यामध्ये जिरेपूड आणि कोथिंबीर टाकून प्यायल्याने पोट थंड राहते आणि पचन उत्तम होते.