Manasvi Choudhary
जेवणानंतर पान खाण्याची सवय अनेकांना आहे. फार पूर्वीपासून जेवणानंतर पान खातात.
आजही अनेक ठिकाणी लग्नसमारंभ असो वा हॉटेलमधील जेवण केल्यानंतर 'खास मुखशवास' म्हणून पान दिला जातो.
मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? जेवणानंतर पान का खातात? जेवणानंतर पान खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?
जेवणानंतर पान खाल्ल्याने लाळ तयार होते. यामुळे जड अन्न पचण्यास आणि अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते.
पानामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे तोंडातील बॅक्टेरिया वाढू देत नाही. यामुळे जेवणानंतर तोंडाला छान सुगंध येतो आणि श्वासाची दुर्गंधी निघून जाते.
आयुर्वेदानुसार, पानाचे सेवन केल्यामुळे शरीराला अन्नातील आवश्यक पोषक घटक शोषून घेण्यास मदत होते आणि चयापचय क्रिया सुधारते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.