sharad pawar  saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar On Ajit Pawar: अजित पवारांना कार्यकारी अध्यक्ष का केलं नाही? शरद पवारांनी सांगितलं कारण

Sharad Pawar Latest News: पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Chandrakant Jagtap

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी पक्षांच्या कार्यकारी अध्यक्षपदाची घोषणा केली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, तर प्रफुल पटेल यांच्याकडे गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

'अजित पवार नाराज नाहीत'

शरद पवार यांनी यावेळी अजित पवार नाराज नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, अजित पवार नाराज आहेत हे असत्य आहे. अजित पवार यांच्यावर अधीच अनेक जबाबदाऱ्या आहेत. ते विधिंमंडळ पक्षाचे नेते आहेत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहेत.

जयंत पाटील यांच्यावर देखील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबादारी आहे. अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल हे उपलब्ध होते. त्यांना पक्षवाढीसाठी वेळ देणं शक्य आहे, असे शरद पवार म्हणाले. (Latest Political News)

पुढील पक्षाध्यक्ष कोण होणार?

कार्यकारी अध्यक्ष पुढील अध्यक्ष होणार? या प्रश्वनावर बोलताना शरद पवार म्हणाले, अध्यक्षपदाची जागा अद्याप रिक्त नाही, ती रिक्त झाल्यावर कोणाला द्यायची याचा विचार करू असे शरद पवार म्हणाले.

सुप्रिया सुळे यांना लोकाग्रहास्तव जबाबदारी देण्यात आली आणि सहकाऱ्यांवर जबाबदारी देण्याचा निर्णय आधीच केला होता असे पवार म्हणाले. तसेच अजित पवार यांनीच सुप्रिया सुळे यांचं नाव सुचवलं असे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT