Maharashtra floods : Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra floods : महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार!'असा ओला दुष्काळ पाहिला नाही', शरद पवारांनी सांगितला मदतीचा मार्ग, VIDEO

Maharashtra floods update : असा ओला दुष्काळ आयुष्यात कधी पाहिली नाही... हे वाक्य आहे शरद पवारांचं... मात्र पवार असं का म्हणालेत आणि पवारांनी नुकसान भरपाईसाठी सरकारला नेमका काय सल्ला दिलाय...? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजवलाय.. तब्बल 70 लाख एकर पीकं पाण्याखाली गेलेत.. आणि शेतकरी उद्ध्वस्त झालाय.. त्यामुळेच महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरतेय... त्यातच आता शरद पवारांनी आपल्या आयुष्यात असा ओला दुष्काळ पाहिला नसल्याचं वक्तव्य केल्यानं अतिवृष्टीची दाहकता अधिकच अधोरेखित होतेय.

खरंतर अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झालाय. लेकरासारखं जपलेलं सोयाबीन, उडीद, मूगासह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.. घरं पडली आहेत... जमीन खरवडून गेलीय.. त्यामुळं शेतकरी हवालदिल झालाय.. नेमकं हेच हेरुन पवारांनी आता शेतकऱ्यांना सावरण्यासाठी भरपाईचा मार्ग सांगितलाय.

पवारांनी सांगितला भरपाईचा मार्ग

नुकसानग्रस्तांना मदत करणं ही केंद्र आणि राज्याची जबाबदारी

केंद्राच्या योजना वापरुन राज्याने भरपाई देणं गरजेचं

पीकांचे वास्तव पंचनामे करणं गरजेचं

वाहून गेलेली जमीन, पीकं आणि खरडून गेलेल्या मातीची भरपाई द्यावी

गुरं वाहून गेल्यानं त्यासाठी मदत द्यावी

वाहून गेलेले पाणंद रस्ते दुरुस्तीसाठीही मदत द्यावी

तातडीची आणि कायमस्वरुपी अशा दोन पद्धतीची मदत द्यावी

आतापर्यंत मराठवाडा भीषण दुष्काळासाठी ओळखला जायचा.. मात्र आता ऋतूचक्रं फिरलं आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झालीय.. त्यामुळे आधीच नापीकी, दुष्काळामुळे कोलमडून पडलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन ठोस मदत देण्याची गरज आहे... मात्र ही मदत कधी दिली जाणार? याकडे अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: संतोष देशमुख खून प्रकरणाची १५वी सुनावणी आज होणार

Ashapura Mata Temple : दिव्यांची आरास अन् देवीची आराधना, नवरात्रीत जा 'आशापुरा देवी'च्या दर्शनाला

Jolly LLB 3 Collection : अक्षय कुमार अन् अर्शद वारसीची जोडी सुपरहिट, 'जॉली एलएलबी ३'ची मंगळवारी छप्परफाड कमाई

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत सरकारी नोकरीची संधी; मिळणार पगार १.२० लाख रुपये; आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT