Gopichand Padalkar Jayant Patil Sharad Pawar  saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar : बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा, पडळकरांचं वादग्रस्त विधान; शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

Sharad Pawar Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जात टीका केली होती. वादग्रस्त वक्तव्यावरुन शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करुन सुनावले आहे.

Yash Shirke

  • गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर टीका केली.

  • यावरुन सर्वस्तरावरुन गोपीचंद पडळकरांवर टीका होत आहे.

  • याप्रकरणामुळे नाराज शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन सुनावले आहे.

Gopichand Padalkar Jayant Patil Sharad Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. पडळकरांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख केला होता. या वादग्रस्त वक्तव्यामुळे शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन 'बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा' असे म्हटले आहे.

सांगलीत अभियंता आत्महत्या प्रकरणावरुन काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकर सामील झाले होते. तेव्हा त्यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत खालच्या पातळीवरील विधान केले होते. या प्रकरणामुळे शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करुन सुनावले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना 'अशी गलिच्छ टीका करणे योग्य नाही' असे म्हटल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या प्रकरणावर संवाद साधला. 'बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा', असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्याआधी अजित पवारांनीही पडळकर यांचे कान टोचले होते. भाजपच्या लोकप्रतिनिधींचे किंवा त्यांच्या नेत्यांचे चुकत असेल, तर त्याची नोंद भाजपने घ्यायला हवी. वादग्रस्त वक्तव्यावरुन महायुतीचे धोरण ठरलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप संदर्भातील जबाबदारी असल्याचे ते यावर निर्णय घेतली, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

सांगलीच्या जतमधील अभियंता प्रकरणावरून गोपीचंद पडळकर विरोध जयंत पाटील असा संघर्ष निर्माण झाला आहे. गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या जहरी टिकेच्या निषेधार्थ इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी आणि जयंत पाटील समर्थकांकडून मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी जयंत पाटील यांच्याच्या इस्लामपूर मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते जतसाठी रवाना होणार आहेत. इस्लामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्रित येत गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि फलक झळकवत संताप व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामावर गेला, परत आलाच नाही, विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; निधनाचे वृत्त कळताच आईने...

Human anatomy facts: मानवी शरीरात किती रक्तवाहिन्या असतात? जाणून घ्या आकडा

Manoj Jarange: जीआर फक्त निमित्त, काहीतरी मोठा डाव शिजतोय; मनोज जरांगेंना संशय

Sanjay Raut : त्यांनी राजन विचारेंचे पाय धुतले पाहिजे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; Video

Jalgaon : दीड वर्षांपूर्वी झाला विवाह; माहेरी आलेल्या विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पित्याचा सासरच्यांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT