Sharad Pawar Maratha reservation Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा; नाशिकमधील सकल मराठा समाजाची मागणी

Maratha Aarakshan News : शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. सर्व आमदार तसेच खासदारांनी अंतरवाली सराटीला जाऊन मनोज जरांगे यांचं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नाशिक येथील मराठा समाजाने केली.

Satish Daud

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून उपचाराचा सल्ला दिला आहे. मात्र त्यांनी उपचारास नकार दिला आहे. यावरून नाशिक येथील मराठा समाज आक्रमक झाला आहे.

शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. सर्व आमदार तसेच खासदारांनी एकत्रित अंतरवाली सराटीला जाऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच त्यांना हमी द्यावी, अशी विनंती मराठा समाजाने केली आहे.

अंतरवली सराटीत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. याबैठकीत मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा, असं बैठकीनंतर मराठा समन्वयकांनी सांगितलं.

जर आमदार आणि खासदार अंतरवाली सराटीला गेले नाहीत तर पहिलं आंदोलन शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरापासून सुरू करणार, त्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करणार, असा इशाराही मराठा समन्वयकांनी दिला आहे.

जर आमदार आणि खासदारांना मतदारसंघात सुरक्षित फिरायचं असेल तर त्यांनी अंतरवाली सराटीला जावं. मनोज जरांगे यांची मनधरणी करून त्यांचे उपोषण सोडवण्याचे प्रयत्न करावे, असा सल्लाही मराठा समाजाकडून (Maratha Reservation) राजकीय नेत्यांना देण्यात आला आहे.

"गोड बोलून मराठ्यांचा काटा काढायचं काम"

मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, माझं उपोषण कठोरपणे सुरू आहे. परंतु राजकीय नेते मराठ्यांना लाडीगोडी लावून गोड बोलून काटा काढायचं काम करत असल्याचं मला दिसून येत आहे. एकीकडे तातडीने मार्ग काढू म्हणायचं आणि पाच पाच दिवस होऊ द्यायचे. हा डाव सुद्धा असू शकतो. त्यामुळे मी कोणतेही उपचार घेणार नाही, असं जरांगेंनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Lip Care: कोरड्या हवेमुळे ओठ काळे पडतायेत? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Local Body Election : राज्यातील निवडणुकीसाठी आयोगाचा नवा प्लान, तब्बल २०० कोटींचा खर्च वाढला, आचारसंहिता कधी लागणार?

Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPATचा वापर शक्य नाही, राज्य निवडणूक आयोगाची स्पष्ट भूमिका | VIDEO

डॉक्टर महिलेसोबत अफेअरचा संशय, भावाकडून KEM रुग्णालयातील डॉक्टरवर चाकूने वार

SCROLL FOR NEXT