Sharad PAwar  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar: शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमुडा ट्रँगल, त्यांच्याजवळ गेलेले संपले; विजय शिवतारेंची टीका

मोठे लोक कुठे काही गेम करतील सांगता येत नाही, असंही शिवतारे यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन जाधव

पुणे : शिवसेना संपवायला राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) जबाबदार आहेत. सगळा दोष पवार साहेबांचा आहे. स्वतःचा फायदा करून घ्यायचा. शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमुडा ट्रँगल आहेत, त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय पवार साहेबांना अपेक्षित होता. म्हणूनच त्यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते, जो निर्णय येईल त्याचं स्वागत केलं पाहिजे. हे मोठे लोक कुठे काही गेम करतील सांगता येत नाही, असंही शिवतारे यांनी म्हटलं. (Latest News)

शिवसेना संपवायला जबाबदार शरद पवार आहेत, सगळा दोष पवार साहेबांचा आहे. 2014 ला शरद पवारांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. तो कट होता. पवार साहेबांना शिवसेना-भाजपचा संसार चालू द्यायचा नव्हता. शरद पवारांनी कधीच शिवसेनेशी मिळवून घेतलं नाही. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पवारांचे मैत्रीपूर्ण संबंध असले तरी राजकीय मतभेद होतेच, असंही शिवतारे यांनी म्हटलं.

2019 ला एका खुर्चीच्या मोहापाय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जाऊन बसले. मात्र शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमुडा ट्रँगल आहेत, त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले अशी टीका शिवतारेंनी केली.

पुढे ते म्हणाले की, 2019 ला एकही उमेदवार नसताना राज ठाकरे यांना पुढे करत लाव रे तो व्हीडीओ म्हणायला लावला आणि गरज संपली की त्यांना झटकून टाकले. उद्धव ठाकरे यांच्या भोळेपणाचा फायदा शरद पवार आणि अजित पवार यांनी घेतला. शरद पवार यांचा डाव काल यशस्वी झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reel Star Death: प्रसिद्ध मराठमोळ्या रिलस्टारचं निधन; राहत्या घरी आढळला मृतदेह, मनोरंजन सृष्टीत खळबळ

Maharashtra Live News Update : अमेरिका इराण युद्धाचा परिणाम धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद

Chanakya Niti : गुढीपाडव्याचं गिफ्ट न देता बायकोला खूश कसं कराल? लक्षात ठेवा या ६ गोष्टी

युद्ध जवळजवळ संपलं, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान, तिसरे महायुद्ध टळले? VIDEO

युद्धामुळे बाजार ढवळून निघालं, सोने-चांदीच्या दरांनी गाठला विक्रमी उच्चांक, आजचा दर काय? VIDEO

SCROLL FOR NEXT