Sharad Pawar On Shivsena Symbol Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar: निवडणूक आयोगाच्या निकालाने ठाकरे गटाला फारसा फरक पडणार नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहेत त्यावर चर्चा करता येणार नाही.

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar reaction : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला दिलेल्या निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि गटाला याचा फारसा फरक पडणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहेत त्यावर चर्चा करता येणार नाही. मात्र निवडणूक आयोगाच्या निकालाने ठाकरे गटाला फारसा फरक पडणार नाही. निवडणूक आयोगाचा निकाल स्वीकारुन नवीन चिन्ह घ्यावं लागेल, असं शरद पवार यांनी म्हटलं. (Political News)

इंदिरा गांधी यांच्यासोबतली असंच झालं होतं. त्यावेळी काँग्रेसचं गाय वासरु चिन्ह होतं. त्यानंतर इंदिरा गांधीच्या काँग्रेसने हाताचा पंजा चिन्ह घेतलं. पण त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी काँग्रेसचं पंजा चिन्ह स्वीकारलं. आताही काही फरक पडणार नाही. काही दिवस चर्चा होत राहील. नंतर लोक विसरुन जातील, असं शरद पवार यांनी म्हटलं.

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. शिंदे आणि ठाकरे गट या दोन्ही गटाची बाजू ऐकून निवडणूक आयोगाने हा निकाल राखून ठेवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मराठा समाजासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

Saturday Horoscope: शनिवार ठरणार फलदायी! 'या' ६ राशींवर होणार पैशांचा वर्षाव, रखडलेली कामं लागणार मार्गी

Maharashtra News Live Update: रक्षाबंधनाच्या दिवशी गरोदर मातेची फरफट; पूल नसल्याने पुरातून कावडीतून जीवघेणा प्रवास

यामाहाचा धमाका! R1 चा लूक अन् धडाकेबाज फीचर्स; भारतात लाँच झाली ऑल-न्यू YZF-R2, किंमत ऐकून हादराल

Brother saves sister life: एक रक्षाबंधन असंही...भावाकडून सर्वात मोठं गिफ्ट; बहिणीला दिलं नवं आयुष्य, भावंडांची कहाणी वाचून डोळ्यांतून टचकन पाणी येईल

SCROLL FOR NEXT