sharad pawar ajit pawar ncp x
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचं मनोमिलन नाहीच! पवारांसाठी अजितदादा संधीसाधू? शरद पवारांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

Maharashtra Politics : शरद पवारांनी अखेर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष मनोमिलनाच्या चर्चांना ब्रेक लावलाय... पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना खोचक टोला लगावलाय.. पवार नेमकं काय म्हणालेत? पाहूयात या रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या चर्चांनी जोर धरला होता.. मात्र एका घावात दोन तुकडे करत शरद पवारांनी अजित पवारांसोबत आणि भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना ब्रेक लावलाय... तर पवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी मात्र सावध भूमिका घेतलीय...

विधानसभा निवडणुकीनंतर पवार काका-पुतण्यांमधील जवळीक वाढत असल्याचं दिसून आलं.. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता.. त्यातच राष्ट्रवादीच्या मनोमिलनाबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी घ्यावा, असं वक्तव्य केलं होतं...या वक्तव्यामुळे चर्चांना आणखीच हवा मिळाली.. मात्र पवारांनी काँग्रेसच्या विचाराचा संदर्भ देत राष्ट्रवादीच्या मनोमिलनाला विरोध दर्शवलाय...मात्र त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? पाहूयात...

- पवारांचं राजकारण काँग्रेसी विचारावर आधारित

- भाजपसोबत गेल्यास पवारांच्या विश्वासार्हतेला धक्का बसण्याची शक्यता

- भाजपसोबत गेल्यास वैचारिक मुद्द्यावर कोंडी होण्याची शक्यता

- भाजपविरोधात लढण्यासाठी पवारांकडे विरोधी पक्षाची मोठी स्पेस

पवारांच्या स्पष्ट भूमिकेनंतर अजित पवार आणि भाजपसोबत जाण्याची इच्छा असलेले नेते मनातली इच्छा दाबून पवारांसोबत निष्ठा कायम ठेवणार की सत्तेच्या दिशेने वाटचाल करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Maharashtra Live News Update: - पुणे आहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव येथे वाहतुककोंडी

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

शुभमन गिल ठरला जगातला एकमेव खेळाडू; ICC कडून चौथ्यांदा खास पुरस्कार

Dhule MIM : धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का; जिल्हा कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा

SCROLL FOR NEXT