SHARAD PAWAR NCP DELHI PRADESH COMMITTEE DISSOLVED saam tv
महाराष्ट्र

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दिल्ली प्रदेश कमिटी बरखास्त; पक्षात खळबळ

Sharad Pawar NCP Delhi Pradesh Committee Dissolved: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिल्ली प्रदेशाची विद्यमान प्रदेश समिती तात्काळ प्रभावाने बरखास्त केली आहे. लवकरच सुकाणू समिती आणि नवी प्रदेश कमिटी जाहीर होणार.

Omkar Sonawane, Bharat Mohalkar

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिल्ली प्रदेशातील संघटनात्मक रचनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष शरदचंद्र पवाराची विद्यमान प्रदेश समिती तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आली आहे. दिल्लीतील पक्षाच्या प्रादेशिक कामकाजासंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाकडून दिल्ली प्रदेशातील संघटनात्मक रचनेत फेरबदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील प्रादेशिक कामकाज सुरळीत आणि प्रभावीपणे चालवण्यासाठी दिल्लीतील प्रादेशिक नेत्यांशी चर्चा करून लवकरच सुकाणू समितीची स्थापना करण्यात येणार आहे.तसेच, दिल्ली प्रदेशाची नवी कमिटीही लवकरच घोषित केली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अलीकडच्या काळात संघटनात्मक पातळीवर फेरबदल सुरू आहेत. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने विविध नियुक्त्या आणि फेररचना करण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT