Sharad Pawar on Amit Shah yandex
महाराष्ट्र

Sharad Pawar on Amit Shah: अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर, पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकारण तीव्र झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आरोपांना शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Dhanshri Shintre

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वीच राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केलेल्या आरोपांना शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार अमित शाहांबाबत नेमकं काय बोलले?

शिर्डीतल्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्राने संपवलं असं म्हणत जोरदार टीका केली होती. तसंच १९७८ पासून शरद पवारांचं दगाफटक्याचं राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेने २० फूट गाडलं अशी टीका केली होती. या सगळ्या टीकेचा शरद पवार यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला. पवारांनी थेट शाहांच्या गुजरातमधल्या तडीपारीच्या मुद्यालाच हात घातला.

दरम्यान तडीपारीच्या टीकेनंतर भाजप आक्रमक झाल्याच दिसतंय. भाजपचे मंत्री आशिष शेलारांनीही आता पवारांवर टीका केलीये. शरद पवारांनी यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

अमित शहांनी माहिती घेऊन टीका केली असती, तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. मात्र यानिमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच भाजप आणि पवारांमध्ये वाकयुद्ध सुरू झालं असून पुढच्या काळाच अधिकच राजकारण तापण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT