Sharad Pawar Group Slams Sanjay Raut 
महाराष्ट्र

Sanjay Raut: मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला राऊतांची हजेरी, शरद पवार गटाने शिकवला प्रामाणिकपणाचा धडा

Sharad Pawar Group Slams Sanjay Raut: राजकीय प्रामाणिकपणाचा अभाव असलेल्या नेत्यांनी उगाचच नैतिकतेच्या गप्पा मारू नये, असं मातेले म्हणाले.

Bharat Jadhav

शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला म्हणून त्यांच्यावर आगपाखड करणाऱ्या संजय राऊतांवर शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल चढवलाय. संजय राऊत यांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला हजेरी लावली. त्यावरून शरद पवार गटाने संजय राऊतांवर टीका केलीय. शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी राऊत हे दुटप्पी भूमिका असणारे राजकारणी आहेत. तसेच राजकीय प्रामाणिकपणाचा अभाव असलेल्या नेत्यांनी उगाचच नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत, असा सल्लाही मातेले यांनी दिला.

शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीतील एका कार्यक्रमात सत्कार केला होता. या सोहळ्यानंतर ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि इतर नेतेमंडळींनी शरद पवारांवर टीका केली होती. आता शरद पवार गटाने संजय राऊतांवर टीका केलीय. राऊतांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहून पुन्हा एकदा आपली राजकीय दुटप्पी भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंना दिल्लीत पुरस्कार देऊन गौरवले. त्यावेळी संजय राऊत यांनी त्यावर कडाडून टीका केली होती. आता त्याच संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुस्तक प्रदर्शनात हजेरी लावली, त्यावरून त्यांच्यावर टीका केली जातेय. त्यामुळे राजकीय निष्ठा आणि विचारधारा प्रश्नचिन्हांच्या भोवऱ्यात सापडली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला, ही वस्तुस्थिती सर्वश्रुत आहे. त्यांच्या पुस्तक प्रदर्शनात उपस्थित राहून संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे महायुतीशी जवळीक साधण्याचा हा प्रयत्न आहे का?

एका बाजुला महायुतीच्या विरोधात आग ओकायची आणि दुसऱ्या बाजुला त्यांच्या समर्थकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावायची, याला काय म्हणावं? असा प्रश्न शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांनीही विचारायला हवा," असं अमोल मातेले म्हणालेत. संजय राऊत यांनी स्वतःला मोठा राजकीय विश्लेषक समजण्याचा प्रयत्न करावा, पण ते स्वतःच कोणत्या विचारधारेचे आहेत हे त्यांनाच माहीत नाही, असा टोलाही मातेले यांनी लगावला.

राजकीय मतभेद असतील तर ताठ मानेने विरोध करावं. पण एका ठिकाणी शिवसेनेच्या गद्दारांना गद्दार म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, हा काय प्रकार आहे? राजकीय प्रामाणिकपणाचा अभाव असलेल्या नेत्यांनी उगाचच नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत. संजय राऊत यांची ही कृती म्हणजे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला धक्कादायक भूमिका असल्याचं मातेले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT