Pune Latest News Saam Digital
महाराष्ट्र

Pune Latest News: काळं फासल्यानंतर नामदेव जाधव याची पहिली प्रतिक्रिया, फेसबूक लाईव्हवरून केली शरद पवारांवर घणाघाती टीका, पाहा व्हिडीओ...

Pune Latest News: पुण्यात भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी आलेले लेखक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासल्याच्या प्रकार घडला होता. त्यानंतर नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Latest News

पुण्यात भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी आलेले लेखक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासल्याच्या प्रकार घडला होता. त्यानंतर नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना फूले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा ही हत्या असल्यांच म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाची भूमिका मांडत असताना, मराठा समाजाला आरक्षण शरद पवार यांच्यामुळेच मिळालं नसल्याची कागदपत्र माझ्या हाताला लागली होती. हे वास्तव असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ते सहन झालं नाही. त्यामुळे आज शिवजयंती अॅट सिंगापूरचा कार्यक्रम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उधळवून लावला. त्यानंतर पत्रकार भवनमध्ये पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आहे. हा हल्ला म्हणजे शिव, फूले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची हत्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगभर जाऊ नयेत यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

मी माझ्या व्यक्तीगत गोष्टीसाठी भांडत नव्हतो. संपूर्ण मराठा समाजाचा विषय होता. त्यामुळे हा हल्ला ५ कोटी मराठ्यांवरील हल्ला आहे. या हल्ल्यातून आज एका पोलीस कर्मचाऱ्याने जीवा महाले सारखा माझा बचाव केला आहे. त्याच्या जिवालाही धोका होता. हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. गृहमंत्र्यांनी संबंधित व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार असल्यांच ते म्हणाले.

या हल्ल्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असून यासाठी कार्यकर्त्यांना जबाबदार धरणार नाही. तर शरद पवार आणि रोहीत पवार यांना जबाबदार धरणार आहे. त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी मोठं पाऊल उचलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या वंशजांवरचा हा हल्ला आहे. असे हल्ले महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे. हल्ल्याबाबतंच उत्तर शरद पवार यांनी आणि रोहीत पवार यांनीच दिलं पाहिजे आणि अशा हल्ल्याना आपण घाबरत नसल्यांच ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

Maharashtra Live News Update: स्वत:च्या फायद्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र, मनसे-शिवसेना युतीवर आशिष शेलारांची टीका

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

SCROLL FOR NEXT