MAHARASHTRA FUEL CRISIS: NCP DEMANDS 25% PETROL PUMPS RESERVED FOR FARMERS Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Fuel Crisis: 24 तासात शेतकऱ्यांसाठी 25 टक्के पेट्रोल पंप राखीव करा; अन्यथा..., राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारला इशारा

Maharashtra Fuel Crisis: पुढील २४ तासांत शेतकऱ्यांसाठी २५ टक्के पेट्रोल पंप राखीव न केल्यास सरकारी वाहनं फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे.

Bharat Jadhav

  • राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवडा गंभीर बनला

  • शेतकऱ्यांसाठी २५% पेट्रोल पंप राखीव करण्याची मागणी

  • राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम

येत्या २४ तासात शेतकऱ्यांना २५ टक्के पेट्रोल पंप राखावी करा, अन्यथा सरकारी वाहनं फिरू देणार नाही, असा गंभीर इशारा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने दिला आहे. राज्यातील अनेक भागात इंधनाचा तुटवडा भासत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर पेट्रोल-डिझेलचा जपून वापरा असं आवाहन करत आहेत.

जळगाव जिल्ह्यात देखील इंधनाचा तुटवडा भासत आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार पक्ष आक्रमक झालाय. पुढील २४ तासात सरकारने शेतकऱ्यांसाठी २५ टक्के पेट्रोल पंप राखीव न केल्यास, कोणतेही सरकारी वाहन रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा शरद पवार गटाच्या वतीने आज जळगावमध्ये देण्यात आला आहे.

पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेत जमिनी तयार करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुढील १५ दिवसात जर शेतकऱ्यांच्या जमिनी तयार होऊ शकल्या नाहीत तर पेरण्या करण्यास अडचणी निर्माण होणार असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तातडीने शेतकऱ्यांसाठी सरकारने डिझेल पंप राखीव करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. जर सरकारने असा निर्णय घेतला नाही तर मात्र कोणतेही वाहन रस्त्यावर फिरू देणार नाही,असा इशारा शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलाय.

शासकीय सेवेतील वाहनांसाठी साठा राखीव ठेवण्याचे आदेश

इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जालना जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांना ५ टक्के इंधन साठा राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. अत्यावश्यक सेवा आणि शासकीय सेवेतील वाहनांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिलेत. तर कॅन, बाटली किंवा प्लास्टिक कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व पेट्रोल पंपांना पाच टक्के इंधनसाठा राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशीमा मित्र यांनी दिलेत.

आठवडाभरात पेट्रोल-डिझेलची दुसऱ्यांदा दरवाढ

शेतीच्या मशागतीची कामं सुरू असल्यामुळे ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवत नाहीये. ट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यात पेट्रोल आणि डिझेलची आठवडाभरात दुसऱ्यांचा दरवाढ झालीय. पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागलंय. याचा मोठा फटका राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनाही बसतोय. नव्या दरवाढीमुळे कुठे किती दर आहे ते पाहूयात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: कल्याणमध्ये भरचौकात तरुणीसोबत अश्लील वर्तन, पोलिसांनी तासाभरात आरोपीला ठोकल्या बेड्या

Fact Check : सरकार म्हणतंय, एक वेळ जेवण सोडा? खरंच अमित शाहांनी विधान केलं? VIDEO

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारला ५ दिवसांची CBI कोठडी

मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला?, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

Thursday Horoscope: कामाचे कौतुक होईल, 5 लकी राशींना स्वामींच्या कृपेने आर्थिक लाभ होणार; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT