MLA Sandeep Kshirsagar Abuses Saam tv
महाराष्ट्र

Beed News: तु कुठे आहेस रे तू? तुझ्या...; आमदार संदीप क्षीरसागर यांची नगरपालिकेच्या लेखापालाला शिवीगाळ

MLA Sandeep Kshirsagar Abuses : शरद पवार गटाचे बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर यांनी नगरपालिकेच्या लेखापालांना शिवीगाळ केलीय. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आलीय.

Bharat Jadhav

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

कुठे आहेस रे तू? तुझ्या..., अशा अर्वाच्य भाषेत शरद पवार गटाचे बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर यांनी एका लेखापालला शिवीगाळ केलीय. संदीप क्षीरसागर यांचा शिवीगाळ करण्याचा नवा कारनामा समोर आल्याने खळबळ माजलीय. संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाचे आमदार आहेत. आमदार क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेचे लेखापाल गणेश पगारे यांना कार्यकर्त्याच्या फोनवरून शिवीगाळ केलीय. याप्रकरणी लेखापाल यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.

गणेश पगारे, असं लेखापालाचे नाव आहे. गणेश पगारे हे सकाळी घरी असताना चौरे नावाचा कार्यकर्ता त्यांच्याकडे आला. त्यावेळी चौरे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना फोन लावून दिला. त्यावेळी आमदार क्षीरसागर यांनी कामाच्या संदर्भात विचारणा करत गणेश पगारे यांना शिवीगाळ केली, अशी तक्रार पगारे यांनी दिलीय. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांकडे लेखी अर्ज करण्यात आला आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गणेश पगारे केली आहे.

आमदारांनी आईवरून दिली शिवी

गणेश पगारे यांनी पोलीस अधीक्षकांकडे आमदार क्षीरसागर यांच्याविरोधात तक्रार दिलीय. पगारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काल आमदार क्षीरसागर यांचा त्यांना फोन आला, त्यावेळी त्यांनी ते कुठे आहेत, याची विचारणा केली. त्यानंतर पगारे यांना आमदारांनी भेटायला बोलवलं. त्याप्रमाणे पगारे त्यांना भेटायला पवार अपार्टमेंट येथे गेले. त्यावेळी आमदार यांचा पीए चौरे यांनी पगारे यांना बाहेर बसायला लावले.

बराच वेळ झाला तरी आमदारांनी पगारे यांना भेटायला बोलवलं नाही. मग काही वेळाने आमदार क्षीरसागर हे ऑफिसच्या बाहेर निघून गेले. तेव्हा चौरे यांना पगारे यांनी आमदार यांच्याविषयी विचारणा केली आणि घरी निघून गेले. त्यानंतर आज सकाळी पगारे आपल्या घरी असताना आमदार यांचे पीए चौरे आमदाराचा निरोप घेऊन आले. त्यांनी आमदाराचा फोन आल्याचं त्याचा फोन पगारे यांना दिला. त्यावेळी आमदार क्षीरसागर यांनी लेखापाल यांना शिवीगाळ केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medical Education Scam : मेडिकल शिक्षण क्षेत्राला हादरवणारा घोटाळा, महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये कॉलेजांवर धाड

Bank Fraud Alert : PWD घोटाळ्याचा पर्दाफाश! SBI अधिकाऱ्याच्या सतर्कतेने १११ कोटींची लूट टळली

Bhindi Bhaji Benefits: हिवाळ्यात भेंडी खा, हाडे दुखींना मिळेल आराम

IND vs SA: टेस्टमधील दारूण पराभवानंतर कोचपदावरून गंभीरची हकालपट्टी? अखेर बीसीसीआयने दिलं उत्तर

Maharashtra Live News Update: मंगळवेढा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीला स्थगिती ,जिल्हाधिकारी यांची माहिती

SCROLL FOR NEXT