Sharad Pawar criticizes Devendra Fadnavis over Maratha andolan lathi charge in Jalna SAAM TV
महाराष्ट्र

Sharad Pawar News: देवेंद्र फडणवीसांची माफी म्हणजे कबुलीच; जालन्यातील घटनेवरून शरद पवारांचा हल्लाबोल

Sharad Pawar on Jalna Lathi Charge: देवेंद्र फडणवीसांची माफी एक प्रकारे लाठीमाराचे आदेश दिल्याची कबुलीच आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

Sharad Pawar on Jalna Lathi Charge: जालन्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून सरकारविरोधात निर्देशने केली जात आहे. यावरून राज्याचं राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे. जालन्यात झालेल्या लाठीचार्जचा आदेश हा मंत्रालयातून आला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे सरकारकडून मात्र या गोष्टीचं खंडण करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

घडलेल्या घटनेचं राजकारण होणं योग्य नाही. काही नेत्यांनी तो प्रयत्न केला. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकांवर टीकास्त्र सोडलंय. तसेच फडणवीसांनी पत्रकारपरिषदेत घेत घडलेल्या घटनेबाबत मराठा आंदोलकांची माफी देखील मागितली. यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांची माफी एक प्रकारे लाठीमाराचे आदेश दिल्याची कबुलीच आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. शरद पवार (Sharad Pawar) यांची आज जळगावमध्ये जंगी सभा होणार आहे. या सभेसाठी शरद पवार जळगावमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, जळगामध्ये दाखल होताच त्यांनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

आरक्षणाची मर्यादा ५० टक्के वाढवण्याची गरज आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देणं योग्य नाही. असं शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आहेत. जालन्यात झालेल्या लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांनी माफी मागणं म्हणजे एकप्रकारे लाठीचार्जचा आदेश दिल्याची कबुलीच असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हा तिघांपैकी एकाने जरी गोळाबाराचे आदेश दिले असतील तर राजकारण सोडतो. पण तसं घडलं नसेल तर त्यांनी राजकारण सोडावं, असं थेट चॅलेंज विरोधकांना दिलं होतं.

त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलं. मला इतकं माहिती आहे की जालन्यात संध्याकाळच्या सुमारास हल्ला झाला. तिथं पोलिसांनी हल्ला केलाय हे उघडपणे दिसतं. याची चौकशी सरकारने करावी. याचे अधिकार सरकारला आहेत. आम्हाला ते अधिकार नाहीत, असं शरद पवार म्हणाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Masala Puri Recipe : गरमागरम चहा अन् रवा-मसाला पुरी, पावसात करा चटपटीत नाश्ता

Avneet Kaur: अवनीत कौरचा 'बोले चूड़ियां' लूक तुम्ही खास सोहळ्यासाठी करु शकता कॉपी

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचं विसर्जन कधी होणार? मंडळाने वेळ सांगितली

Maharashtra Live News Update: : विरार पोलीस ठाण्याच्या गणरायाचा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न

Navratri Festival 2025: नवरात्र 2025 कधी आहे? तारीख, मुहूर्त आणि पूजा माहिती

SCROLL FOR NEXT