Sharad Pawar Saam Digital
महाराष्ट्र

Sharad Pawar : भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा; कोल्हापुरात शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Sharad Pawar Latest Speech : आवाज उठणाऱ्या व्यक्तीचा आवाज बंद करू शकतो हा संदेश देशभरात दिला जातोय. तसेच सध्या देशात 'भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा' अशी स्थिती आहे, अशा शब्दात शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

संभाजी थोरात

Sharad Pawar kolhapur Latest Speech :

शरद पवारांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे लोकापर्णाच्या कार्यक्रमात भाजप सरकारवर जोरदार टीका केली. 'आपल्या विरोधात कोण आवाज उठवत असेल त्याच्याविरोधात सत्तेच्या गैरवापर करण्यात येत आहे. आवाज उठणाऱ्या व्यक्तीचा आवाज बंद करू शकतो हा संदेश देशभरात दिला जातोय. तसेच सध्या देशात 'भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा' अशी स्थिती आहे, अशा शब्दात शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे लोकापर्ण ज्येष्ठ नेते शरद पवार, शाहू छत्रपती, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांनी उपस्थिती लावली. कोल्हापूरच्या प्रतिभानगर येथे स्मारक उभारण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

शरद पवारांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

१. गोविंद पानसरे यांच्यावर हल्याच्या माध्यमातून पुरोगामी विचार नष्ट करू असा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला. ज्यांच्याकडे विचार नाही. अशी प्रवृत्ती कायदा हातात घेऊन अशी कृती करत गेली. आज प्रतिगामी शक्ती वाढत आहे

२.⁠ देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे अधिवेशन असताना पंतप्रधान अधिवेशनासाठी फक्त वीस मिनिटं संसदेत आले. सत्तेचा गैरवापर सध्या सुरू आहे.

३.⁠ प्रतिगामी शक्तींना दूर ठेवणे हीच पानसरेंना श्रद्धांजली ठरणार आहे. देशातील भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा अशी स्थिती सध्या आहे.

४. ⁠हा संघर्ष फक्त निवडणुकीपुरता नाही. एकत्र येऊन अशा प्रतिगामी विचारांना रोखण्याची गरज आहे.

५. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने नेहमीच राज्याला एक दिशा दाखवली आहे.⁠ पुरोगामी विचार जिवंत ठेवण्यासाठी कोल्हापूरकरांना शाहू महाराजांकडून अपेक्षा आहेत. पुरोगामी शक्ती वाढवण्यासाठी शाहू महाराजांची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT