केंद्र सरकारचं नागरिकांचे प्रश्न सोडवत रस नाही. पक्ष फोडीचे राजकारण कसं तयार करतात, ही भूमिका केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात घेतली जाते. त्याचा परिणाम नागरिकांच्या प्रश्नावर होतो, अशी टीका शरद पवार यांनी केली. दिवाळी पाडव्याच्या निमित्त व्यापारी मर्चंट असोसिएशनच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली. (Latest News)
आपल्या भाषणात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लक्ष्य केले.राजकारणात राज्यकर्त्यांना अधिक रस दिसतो. मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन पक्ष फोडाफोडीमध्येच अधिक लक्ष दिले जातंय. लोकांमधील अंतर वाढविण्याचे काम नेतृत्वाकडून केले जात असल्याची टीकाही पवारांनी यावेळी केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
देशातील उत्पादक, व्यापारी यांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा पंतप्रधान, अर्थमंत्री व कृषीमंत्री यांचा सकारात्मक दृष्टीकोन नाहीये. केंद्र सरकारचा या घटकाकडे बघण्याचा दृष्टीकोण समजस्यपणाचा नाही. अर्थमंत्र्यांनी विविध विषयांसंदर्भात खासदारांना विश्वासात घेऊन चर्चा करत प्रश्न सोडवली पाहिजेत. याचा विसरच सध्याच्या सरकारला पडलाय. केंद्र सरकार चालवत असताना अनेक धोरण लोंकाना कळत नाहीत, याच कारण सुसवांद नाही.
व्यापारी, उत्पादक यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी देशाच्या अर्थमंत्र्यांनी त्यांच्याशी सुसंवाद ठेवायला हवा. परंतु दुर्देवाने असा सुसंवाद करण्याची पद्धत सरकारने बंद केल्याचं दिसत आहे. केवळ माझ्याशीच नाहीतर संसदेतील अनेक खासदारांशीही पंतप्रधान आणि अर्थमंत्री चर्चा करत नसल्याचं पवार म्हणालेत.
सहकारी मंत्र्यांच्या खात्यात अजिबात हस्तक्षेपच करायचा नाही अशी पंतप्रधानांची भूमिका दिसते, ते अर्थाने चांगलेही आहे पण प्रश्न सोडविण्यासाठी नंबर एकच्या व्यक्तीने प्रसंगी हस्तक्षेप करायला हवा, पण तसं होत असल्याचा खेद देखील शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्र्यावर केली जाणाऱ्या टीकेवरही शरद पवार यांनी नाराजी व्यक्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांना राजकारणातील गुरू मानतात. परंतु मोदींकडून मुख्यमंत्र्यांवर केल्या जाणाऱ्यांना टीकेवरून पवारांनी खेद व्यक्त केलाय. आता पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याच्या प्रचार पंतप्रधान मोदी करत आहेत. यादरम्यान ते एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांनी राज्य खाल्ले अशी टीका केली.
आपण इंदिरा गांधी यांच्यासह अनेक पंतप्रधानांचे कामकाज जवळून पाहिलं. पंतप्रधानांकडून जर असे आरोप या भाषेत व्हायला लागले तर लोकांनीच आता याचा विचार करायला हवा, असं पवार म्हणालेत. एखाद्या राज्याच्या प्रमुखाची अप्रतिष्ठा होईल असे शब्द पंतप्रधानांनी वापरू नयेत असंही ते म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.