Sharad Pawar Resigns Latest Update Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar : सत्तेचा गैरवापर कसा होतो हे भाजपने दाखवून दिलं...; शरद पवारांचं भाजपवर टीकास्त्र

सांगोल्यात कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेतल्यावर ते आता पुन्हा एकदा ऍक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत. सत्तेचा गैरवापर कसा होतो हे भाजप ने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रामधील उद्धव ठाकरे यांच्या काळातील सरकारमध्ये जे लोकं बाजूला गेले ते कशासाठी गेले का गेले? त्यांचे त्यांना माहिती पण हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेला पटला नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजप सरकारला लगावला आहे. (Latest Marathi News)

लहान मुलांच्या मुखात खोके आणि खोकेवाला

सांगोल्यात कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलंय. यावेळी ते म्हणाले की, शिंदे सरकारला जनमाणसाचा पाठिंबा मिळवता आलेला नाही. सध्या लहान मुलांच्या मुखात खोके आणि खोकेवाला हा शब्द आला आहे. राज्यातील राजकारण स्वच्छ करायचे असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे लागेल, असं ठामपणे शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलं.

तसेच यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील पवारांनी निशाणा साधलाय. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत पवारांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र ते ५ वर्ष मुख्यमंत्री झाले नंतर ते उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे आम्ही आधीच आश्वासन देत नाही.

तसेच रवींद्र धंगेकर यांचे कौतुक करत शरद पवार म्हणाले, निवडणुका लढवणे सोपे नाही पण कर्तुत्व असेल तर लोकं मोठं आणि छोटं कोणी बघत नाहीत. मी रवींद्रची चौकशी केली होती. तेव्हा मला सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की हा माणूस असा आहे की एखाद्या कुटुंबात एखाद्याचे दुःख कमी करण्यासाठी हा माणूस नेहमी प्रयत्नशील असतो. धनगर, लोणार समाजाला राजकारणात संधी द्यायला हवी. ज्या काही निवडणुका येतील त्या निवडणुकीत महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी असेल, असं शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT