शरद पवारांनी केले गणपतराव देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन; म्हणाले... SaamTv
महाराष्ट्र

शरद पवारांनी केले गणपतराव देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन; म्हणाले...

आमदार गणपतराव देशमुख यांच्या सोबत आपण अनेक वर्षे राजकीय क्षेत्रामध्ये काम केले आहे. स्वच्छ प्रतिमेचा व चारित्र्य संपन्न असा महाराष्ट्रातील हा नेता होता.

भारत नागणे

सांगोला : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगोला येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. आज दुपारी १२.३० वाजता शरद पवार सांगोला मधील गणपतराव देशमुख यांच्या घरी दाखल झाले. यावेळी गणपतराव यांच्या पत्नी रतनबाई, मुलगा चंद्रकांत, पोपटराव, मुलगी शोभा पाटील, नातू अनिकेत व बाबासाहेब उपस्थित होते.

हे देखील पहा -

यावेळी गणपतरावांबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, आमदार गणपतराव देशमुख यांच्या सोबत आपण अनेक वर्षे राजकीय क्षेत्रामध्ये काम केले आहे. स्वच्छ चारित्र्य संपन्न असा महाराष्ट्रातील हा नेता होता. सुरुवातीला आमच्या कुटुंबातील लोकांनी सुद्धा शेतकरी कामगार पक्षात काम केले आहे. त्यामुळे शेकाप यामधील अनेक ,नेतेमंडळींची आमच्या घरात वर्दळ असायची. त्यात गणपतराव देशमुख यांचाही समावेश होता. माझे वडील बंधू आप्पा साहेब यांच्याशी गणपतराव यांचे चांगले स्नेहसंबंध होते.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांसंदर्भातली चिंता नेहमी गणपतराव व्यक्त करायचे. दुष्काळी सांगोला मधून सुरू झालेली रोजगार हमी योजना. या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळाला. त्यामुळे या योजनेची दखल केंद्र सरकारने सुद्धा घेतली होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोन्याच्या भावात अचानक मोठी उलथापालथ! आठवड्यात सोनं तब्बल ₹३,४४० ने स्वस्त; पाहा १८, २२ अन् २४ कॅरेटचे नवे दर?

Maharashtra News Live Update: कृष्णराज महाडिक नेमके काँग्रेसचे की भाजपचे?

Supreme Court : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रासह ८ राज्यातील उच्च न्यायालयांना नवे मुख्य न्यायाधीश; पाहा कोणाची कुठे नियुक्ती

Best Teas For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 5 चहा ठरतील फायदेशीर; जाणून घ्या कोणते आहेत?

Ukadiche Modak Recipe : उकडीचे मोदक फाटतात? 'ही' ट्रिक वापरा, प्रत्येक मोदक बनेल परफेक्ट

SCROLL FOR NEXT