Sharad Pawar statement on joining NDA Saam TV marathi
महाराष्ट्र

'पंतप्रधान मोदींना भेटलो अन् चर्चा रंगल्या...'; NDA मध्ये जाणार की नाही? शरद पवारांनी बैठकीत स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar clarifies his NDA stand : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भेटीनंतर शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत शरद पवारांनी आपण विरोधातच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar statement on joining NDA : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीनंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष (शरदचंद्र पवार) एनडीए (NDA) आघाडीत सामील होणार का? या चर्चांनी जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या दोन दिवसीय जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत शरद पवारांनी या सर्व चर्चांवर थेट आणि उघड भाष्य केले. पंतप्रधान मोदींशी झालेली भेट ही वैयक्तिक किंवा राजकारणासाठी नसून जनतेच्या आणि राज्याच्या प्रश्नांसाठी होती, आपण विरोधातच राहून लढणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये जाण्याच्या सर्व शक्यता आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

शरद पवार यांनी मागील काही दिवसांत २ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनाही सर्व खासदारांसह मोदींची भेट घेतली होती. त्याशिवाय सुळे यांनी बजरंग सोनवणे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्य चर्चेला जोर धरला होता. पण आता शरद पवार यांनी आपण विरोधाताच राहणार असल्याचं स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची दोन दिवसीय बैठक शनिवार आणि रविवारी पार पडली. या बैठकीत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस NDA सोबत जाणार का? असा सवाल काही जिल्हाध्यक्षांकडून उपस्थित करण्यात आला होता. त्यावर शरद पवार यांनी ‘आपण विरोधातच आहोत, कोणीही संभ्रमात राहू नये. जोमाने काम करा,’ असा स्पष्ट संदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांना 'सरकारविरोधी लढ्याचा' संदेश

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा संदर्भ देत पदाधिकाऱ्यांचे लक्ष पक्षाच्या सरकारविरोधी भूमिकेकडे वेधले. "सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आपण संसदेत ज्या ताकदीने लढत आहोत, त्याच पद्धतीने आपल्याला आता रस्त्यावर उतरूनही लढायचे आहे," असा थेट संदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे पक्षाच्या सरकारविरोधातील भूमिकेबाबत कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये, ही बाब या बैठकीतून स्पष्ट करण्यात आली.

याशिवाय, सुप्रिया सुळे यांनी आपण लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचेही जाहीर केले. "लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढा, जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे तातडीने भरा आणि कामाला लागा," असे स्पष्ट निर्देश त्यांनी जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. शनिवार आणि रविवारी झालेल्या या दोन दिवसीय बैठकीत सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील पक्षाच्या संघटनात्मक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये 2% वाढ, थकबाकीसह मिळणार बंपर लाभ

Mangalagaur : मंगळागौरीच्या कार्यक्रमांची मजा वाढेल उखाण्यांनी! विवाहित महिलांसाठी खास मजेशीर उखाणे

Shehzad Poonawalla : माझ्यासाठी हा अत्यंत भावुक क्षण...; भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime: IPS अधिकाऱ्याच्या आईची हत्या, घरामध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT