महाराष्ट्र

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jayant Patil: शरद पवार जयंत पाटील यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांना शरद पवार गटाकडून मुख्यमंत्री केलं जाण्याची शक्यता आहे. मात्र मविआत त्यांच्या नावाला विरोध होत असल्याचंही सांगितलं जात आहे.

Snehil Shivaji

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपात राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.. असं आम्ही का म्हणतोय, तर ऐका शरद पवार काय म्हणतायेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या इस्लामपुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा समारोप झाला. यावेळी मुसळधार पावसातही जयंत पाटलांचे कार्यकर्ते हे डोक्यावर खुर्च्या घेऊन भर पावसात शरद पवारांना ऐकण्यासाठी चिखलात उभे होते. य़ाच वेळी शरद पवारांनी जयंत पाटलांचं कौतुक करतांना महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी मी जयंत पाटलांवर टाकतो असं म्हणत राष्ट्रवादीचा चेहरा जाहिर करुन टाकला.

शरद पवारांनी घोषणा करताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं. आणि त्यांनी या सभेत मुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी जयंत पाटलांनी मुख्यमंत्रीपदासाठी खुप उठाबशा काढव्या लागतात म्हणत वेळ मारुन नेली. मात्र पवारांनी जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी असल्याचा पुनरूच्चार केला.

पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यानं ठाकरेगटाची मात्र गोची झाल्याचं दिसलं. कारण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणत शिवसैनिकांना चेतवणाऱ्या संजय राऊतांनी एकाच पक्षाचे २-३ मुख्यमंत्री होत नाही असं म्हणत ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा दावा कायम ठेवलाय. लोकसभेत कमी जागा घेऊनही पवारांच्या राष्ट्रवादीनं चांगली कामिगिरी केली. तसंच विधानसभेला कमी जागा घेऊन पवार जास्त जागा निवडून आणून थेट मुख्यमंत्री पदावरच दावा करण्याची रणनिती आखतायेत असं दिसतंय. जयंत पाटलांचे मविआसोबतच महायुतीतील नेत्यांसोबतही चांगले संबंध असून जयंत पाटील हे मविआचा सर्वसमावेशक चेहरा म्हणून राज्याचं नेतृत्त्व करतात का? हे येत्या 23 नोव्हेंबरलाच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT