sharad pawar , devendra fadnavis, mla sumantai patil Saam TV
महाराष्ट्र

Sangli News : सुमनताई पाटील उपाेषण साेडणार? शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना फाेन, राेहित पाटील म्हणाले...

आमदार सुमनताई पाटील यांचे चिरंजीव राेहित व शेकडाे कार्यकर्ते उपाेषणास बसले आहेत.

विजय पाटील

Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन आमदार सुमनताई पाटील यांची भूमिका समजून घ्यावी असे सूचित केल्याचे युवा नेते राेहित पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. दरम्यान आमदार सुमनताई पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यास त्या आज (मंगळवारी) बेमुदत उपोषण साेडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

टेम्भू सिंचन योजनेत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करावा,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई आर आर पाटील या साेमवारपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसल्या आहेत. त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव राेहित पाटील व शेकडाे कार्यकर्ते देखील आहेत.

साम टीव्हीशी बाेलताना राेहित पाटील म्हणाले आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत सरकार आमच्या मागणीबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करीत आहाेत. सुधारित प्रशासकीय मान्यतेबाबत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्हांला फोन केला होता. आंदोलनाबाबत माझ्या आईच्या प्रकृतीची चौकशी दाेघांनी केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आंदोलनाच्या मागणी तात्काळ पूर्ण करावी अशी विनंती देखील केल्याचे पाटील यांनी नमूद केले.

पाटील पुढे म्हणाले माझी तब्येत दोन दिवसांपूर्वी बिघडली होती. पण आम्ही उपोषणाची तारीख जाहीर केली होती. त्यामुळे तब्येत बरी नसताना सुद्धा उपोषण करावे लागले आणि आम्ही केले आणि या उपोषणाला यश येईल अशी आशा आहे असेही पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

फक्त इडली-डोसा नाही! यंदा पावसाळ्यात ट्राय करा 'हे' 5 गरमागरम साऊथ इंडियन पदार्थ

Gingee Fort : जिंजी किल्ला पाहायला जाताय? मग जवळच असलेली ‘ही’ ५ स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन्स नक्की फिरा

Samantha Ruth Prabhu : ३९व्या वर्षी सामंथा रुथ प्रभु आई होणार? 'त्या' व्हायरल VIDEO ने सुरू झाली चर्चा

SCROLL FOR NEXT