Sharad Pawar NCP News Saam tv news
महाराष्ट्र

Sharad Pawar On Barsu Refinery Protest: 'सर्वे थांबवा, प्रोजेक्ट अडचणीत येईल...' बारसू रिफायनरी संदर्भात शरद पवारांची उदय सामंत यांच्याशी चर्चा

Barsu Refienry Protest News: चर्चेनंतर उदय सामंत यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना कळवतो, असे आश्वासन दिले आहे..

Rashmi Puranik

Barsu Refinery Protest: कोकणातल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (Barsu Refinery Project) सर्वेक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. या सर्वेक्षणाला विरोध करत ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या आंदोलकांवर पोलिसांच्या (Ratnagiri Police) बळाचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोन करत सर्वे थांबवण्याबद्दल चर्चा केल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बारसू रिफायनरी प्रकल्पाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी फोनवरुन चर्चा केली आहे. या चर्चेमध्ये शरद पवार यांनी "हा सर्वे थांबवा, लोकांशी आपण चर्चा करुया, एकत्र बसून विश्वासात घेऊन केलं पाहिजे नाहीतर, प्रोजेक्ट अडचणीत येईल," अशी भूमिका मांडली आहे.

तसेच शरद पवार यांनी "या आंदोलनात ज्यांना अटक केली त्यांना सोडून द्यावे, असेही सांगितले आहे. शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उदय सामंत यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना कळवतो, असे आश्वासन दिले आहे. तसेच या संदर्भात उदय सामंत आणि शरद पवार उद्या सिल्वर ओकवर भेट होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे..

राजू शेट्टींनीही दिला होता इशारा..

या प्रकल्पाबद्दल बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी "बारसू प्रकल्प लादण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी घेवून आंदोलकांसोबत उभा राहीन; स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होऊ देणार नाही, त्यामुळे दडपशाहीचा मार्ग अवलंबाल तर हे प्रकरण महागात पडल्याशिवाय राहणार नाही," असा इशाराही शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

SCROLL FOR NEXT