वाढदिवसाला भव्यदिव्यता दाखवून गरिबांच्या पोटाची भुक शमणार आहे का? SaamTvNews
महाराष्ट्र

वाढदिवसाला भव्यदिव्यता दाखवून गरिबांच्या पोटाची भुक शमणार आहे का? (Video)

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त सजलेल्या परळी वरून पंकजा मुंडेंचा थेट धनंजय मुंडेंवर निशाणा!

विनोद जिरे

बीड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त सजलेल्या परळी वरून पंकजा मुंडेचा थेट धनंजय मुंडे वर निशाणा साधला आहे. स्वतःचा वाढदिवस व आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना भव्यदिव्यता दाखवून सामान्य लोकांना काय मिळणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे. खूप मोठी प्रतिकृती बनवली, पेंटिंग्ज केलं म्हणजे गरिबांच्या पोटाची भुक शमणार आहे का? हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत. म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली.

हे देखील पहा :

कितीही मोठ्या कमानी लावल्या कितीही मोठ्या रांगोळ्या काढा, कितीही मोठे कट आउट लावले, कितीही कोटीच्या जाहिराती दिल्या तरी त्यात गरिबाला काय मिळालं? याचा विचार करावा अस पंकजा मुंडे म्हणाल्या. गोपीनाथ गडावर आयोजित लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्या बोलत होत्या. यावेळी खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार नमिता मुंदडा यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, आजचा दिवस हा जनसेवेसाठी समर्पित केलेला आहे. आत्तापर्यंत गोपीनाथ गडावर देशाचे व राज्याचे अनेक मान्यवर नेते येऊन गेले. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जयंत पाटील येऊन गेले. पक्षाचा कुठलाही भेदभाव गडावर नाही. दरवर्षी गोपीनाथ गडावर गरिबातील गरीब लोक येतात. मात्र, यावर्षी आम्ही गोपीनाथ गड गावागावात घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. आज गोपीनाथ गडाला येऊ देऊ नका असे सांगितले. गोपीनाथ गड शेतकऱ्यापर्यंत कष्ट करून सोबत वीट भट्टी, खडी फोडणाऱ्या पर्यंत घेऊन जा. असे आवाहन मी कार्यकर्त्यांना केल्याचे त्या म्हणाल्या.

सन्माननीय शरद पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त परळी शहर आज पूर्ण सजले आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मुंडे साहेबांच्या नगरीत पवार साहेबांचे मोठमोठे कट आउट बॅनर लागले आहेत. त्यामुळे मुंडे साहेबांच्या जयंतीमध्ये पवारसाहेब सामील झाले असं वाटतं. अशी खोचक टिपण्णी करत पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT