नाशिकमध्ये मंदिरे उघडण्यासाठी रामकुंडावर शंखनाद आंदोलन अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

नाशिकमध्ये मंदिरे उघडण्यासाठी रामकुंडावर शंखनाद आंदोलन

मंदिरं खुली करण्यासाठी भाजप आक्रमक

अभिजीत सोनावणे

नाशिक - राज्यातील मंदिरं Temple भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपने BJP पुन्हा एकदा राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाची हाक दिली आहे. नाशिकमध्येही Nashik रामकुंडावर Ramkund भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले Tushar Bhosle यांच्या नेतृत्वाखाली शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. राज्यात सर्व काही अनलॉक होत असतांना मंदिरं मात्र अजूनही दर्शनासाठी बंद आहेत.

अनलॉक दरम्यान एकीकडे सर्व दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, वाईन शॉप खुली झालेली असतांना राज्यभरातली मंदिरं मात्र अद्याप कुलूपबंद आहेत. त्यामुळे मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. राज्यात ठिकठिकाणी मंदिरं भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी हे शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

मंदिर हम खुलवायेंगे, धर्मको न्याय दिलायेंगे अशी हाक देत भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाची हाक दिली आहे. कोरोना उद्रेकामुळे जावपासपास गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील सर्वच प्रमुख मंदिरे बंद आहेत. त्याविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी भाजप आध्यात्मिक आघाडी तर्फे आज रामकुंडावर शंखनाद आंदोलन होणार असल्याची माहिती तुषार भोसले यांनी दिली.

या वेळी नागरिकांसह साधू, संत, विविध मंदिराचे पुजारी उपस्थित राहून राज्य शासनाचा निषेध करणार आहे. राज्य सरकारने मॉल, बार सुरू करण्यास परवानगी दिली परंतु मंदिरं उघडण्याबाबत चालढकल चालविली आहे. याविरोधात राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाची हाक दिल्याचे आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT