Shambhuraj Desai, Sanjay Raut, Eknath Shinde, Maharashtra Karnataka Border Dispute saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai : वाचाळ बडबड करणा-या राऊतांना 'हे' सांगायला चाेवीस तास का लागले ? शंभूराज देसाई

पुढील काळात कर्नाटकात जायचं हे नक्की आहे. कधी हे सांगायचं नसत असेही देसाईंनी नमूद केले.

ओंकार कदम

Shambhuraj Desai : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरुन महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विराेधी नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक हल्ले हाेऊ लागले आहेत. साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी आजही शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबाेल करीत तुम्हांला धमकीचे फाेन आले हे सांगण्यास चाेवीस तास का लागले असा सवाल राऊतांना केला आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सातारा येथे पत्रकार परिषद सुरु आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालास प्रारंभ झाला आहे. त्यावर बाेलताना देसाई म्हणाले कितीही कुणी यात्रा काढल्या, कुणाच्या पाठीमागे राहायचं प्रयत्न केला, कुणाच्या हातात हात घालून चालला तरी काही फरक पडत नाही हे आजच्या निकालानंतर स्पष्ट हाेईल असा टाेला देसाईंनी (shambhuraj desai) राहूल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष मारला. (Maharashtra News)

देसाई म्हणाले संजय राऊत (sanjay raut) यांनी त्यांची वाचाळ बडबड बंद करावी. त्यांच्यात काेणत्याही प्रकारचे धाडस नाही हे यापुर्वीच सर्व महाराष्ट्राने पाहिली आहे. आता चाेवीस तासांनंतर राऊत म्हणतात मला धमकीचे फोन आले. त्यांना माध्यमांच्या समोर येऊन सांगायला चाेवीस तास का लागले असा सवाल देसाईंनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय; गळफास घेत दोघांनी आयुष्य संपवलं

Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा

Leopard Attack : बिबट्यानं आधी हल्ला केला, मग फरफटत नेलं, वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूनं हळहळ

SCROLL FOR NEXT