सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात अपप्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही असा इशारा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी सातारा येथे खंडणीखाेरांना दिला. ''मास' औद्योगिक प्रदर्शन - २०२३' चे (Manufacturer's Association Of Satara) उद्घाटन मंत्री देसाईंच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते. व्यापीठावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (mla shivendrasinhraje bhosale) यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती हाेती. (Maharashtra News)
पालकमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले जिल्ह्याची प्रगती होत असताना अपप्रवृत्ती समोर येत असतात. मी गृहराज्यमंत्री असताना अशा प्रवृत्तींना आळा घातला होता. औद्योगिक प्रगतीत काेणी अडथळा आणत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. या प्रवृत्ती मोडीत काढल्या जातील अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाईंनी उद्याेजकांना दिले.
शासन उद्योग उभारणीसाठी सकारात्मक असून उद्योगवाढीसाठी नियमावलींमध्ये बदल केले आहेत. सातारा जिल्हा उद्योग क्षेत्रामध्ये राज्यात अग्रेसर होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असेही मंत्री देसाईंनी नमूद केले.
जिल्ह्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी सर्व सोयी-सुविधांच्या उपलब्धतेबरोबरच आवश्यक सहकार्य राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही देसाईंनी दिली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील त्यांचे मनाेगत व्यक्त केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'मास'चे जितेंद्र जाधव, राजेंद्र मोहिते, धैर्यशील भोसले, अस्लम फरास, उद्योजक नितीन माने, श्रीकांत पवार, वसंत फडतरे, दिलीप उटकर यांच्यासह उद्योजक, स्टॉलधारक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.